जतमध्ये माजी आमदार विलासराव जगतापाची चाणक्यनिती

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत पंचायत समितीच्या निवडणूकीत भाजपची सत्ता आणत मनोज जगताप व विष्णू चव्हाण यांची निवड होण्यापर्यत घडलेल्या घडामोडी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या चाणक्यनितीचा पुन्हा प्रत्यय आणून देणाऱ्या ठरल्या आहे.विधानसभा निवडणूकीत भाजपची हवा असतानाही झालेला पराभव,व अनेक शिलेदार सोडून गेलेली सल विसरून जगताप यांनी नेमक्यात चाली टाकत शिक्षण सभापती तम्मणगौडा रवीपाटील यांची नाराजी दूर करत जाड्डरबोबलाद येथील विकास कामांना उपस्थिती लावत सर्व मनसुबे उधळविले.पंचायत समिती निवडणूकीत भाजपचे जेष्ट नेते प्रकाश जमदाडे यांच्याशी ऐनवेळी जुळवून घेत  आपल्या पुर्वाश्रमीच्या शिलेदारांना एकसंग करत मिळविलेला विजय उल्लेखनीय आहे.विधानसभा निवडणूकीत जगताप यांचे निकटचे समर्थक माजी सभापती प्रकाश जमदाडे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवीपाटील यांचे बंड शमवित पंचायत समितीची सत्तेबरोबर जिल्हा परिषदेतही भाजपच्या सत्तेची गोळाबेरीज जमवून देण्याची कामगिरी माजी आमदार जगताप यांनी केली आहे. जत भाजपचा वाद मिटणार नाही म्हणून बेसावध राहिलेल्या विरोधकांना माजी आमदार जगताप यांच्या चालीने धे धक्का दिला आहे.

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.