जत,प्रतिनिधी : जत शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर महामार्गाचे रखडलेले काम आतातरी चालू होणार का ? असा संतप्त सवाल नागरिकातून व्यक्त होत आहे.जत शहरातील हॉटेल संस्कृत्ती ते चडचण रोड पर्यतचे काम गेल्या दोन वर्षापासून विविध कारणांनी रखडले आहे.विधानसभा निवडणूकीपुर्वी शहरा लगतीची कामे सुरू करण्यात आली.त्यामुळे शहरातील रस्ता आता चकाचक होणार असे वाटत असताना पुन्हा काम बंद पडले.शहरातील पिण्याची पाईपलाईन या रस्त्याखालून असल्याने कामास अडचणी येत असल्याचे कळतेय.त्या पाईपलाईन काढून बाजूने घालाव्या लागतील.मात्र रस्त्यावर पडलेले खड्डे व धुळीने वाहन चालकासह लगतचे दुकानदार बेजार झाले आहेत.यात्रेअगोदर रस्त्याचे काम करण्याचे आदेश आमदार विक्रमसिंह सांवत यांनी दिले होते.मात्र आता यात्राही संपली आहे.कामास सुरुवात करावी अशी मागणी होत आहे.