जतेत मुदतबाह्य शितपेयाची विक्री

0

जत,वार्ताहर: जत तालुक्यात सध्या ऐन थंडीत उन्हाचा तडाखा जाणवत आहे.त्यामुळे शेतपेयाची मागणी होत आहे. मात्र अनेक गावात विक्री केली जाणारे थंडपेये मुदत बाह्य विक्री होतानाचे चित्र आहे.गत उन्हाळ्यातील माल तसाच ठेवून विकला जात आहे. तसेच एआरपी पेक्षा कुलिग चार्ज म्हणून  5 ते 15 रुपयापर्यत नियमबाह्य पैशाने शितपेय विक्री केली जात आहेत.उन्हाने कायली होत असल्याने नागरिकानी थंडवा मिळविण्यासाठी थंडपेयाची स्टॉलकडे ओडा वाढला आहे. मागणी वाढल्याने अनेक ,कोको-कोला,लस्सी मॅगो, पेप्सी मिरिंडा आदी पदार्थ हे वैधता तारीख संपलेले मिळत आहेत.त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.जून्या तारखेचे थंड पेय असून ही त्याचे मुळ किंमतपेक्षा जास्त दराने विक्री होत आहे.दुकानदारानी एम आर पी पेक्षा जास्त दराने विक्री करुन नागरिकांची लुबाडणूक करत आहेत . परवाना नसताना तेही जास्त दराने मालाची विक्री होत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देवून अशा दुकानदारावर कारवाई करावी अशी मागणी येथील जनतेतून होत आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.