जत | पुन्हा अवकाळी,द्राक्षबागा धोक्यात | पिकांवर तांबेराची भीती : डफळापूर,जत परिसरात सायकांळी रिमझिम |

0

त,प्रतिनिधी : जत तालुक्यातील जत,डफळापूर परिसरात गुरुवारी सांयकाळी अवकाळीचा रिमझिम पाऊस झाला. यामुळे पिकांवर तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. तर ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे. यावर्षी तालुक्यात सप्टेंबरपासून मान्सूनचा पाऊस सतत पडला. तर ऑक्टोबरच्या अखेरीपासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळीचा पाऊस झाला. यामुळे पिके आणि फळबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.आताही धोका वाढला आहे. तर सततच्या पावसाचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवरही झाला. त्यामुळे उशिरा पेरणी झाल्याने सध्या पिकेही अजून लहानच आहेत. 

‘गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे किमान तापमान झपाट्याने कमी झाले आहे.यामुळे उकाड्यातही वाढ झाली. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडायला लागलाय. गुरुवारी सांयकाळी जत तालुक्यातील जत शहरासह डफळापूर परिसरात सुमारे 10-15 मिनिटे रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडला. सायकांळी चारच्या दरम्यान व सायकांळी आठ वाजता पाऊस झाला.हवेत गारवा निर्माण झाला होता.या रिमझिम पाऊस पडला.हा पाऊस परिसरातील डफळापूर, बेंळूखी,खलाटी आदी गावांतही झाला. यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांवर तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावाची भीती वाढलीय. तसेच या भागात फळबागा आहेत. ढगाळ वातावरण कायम राहून अवकाळी पावसाने झोडपल्यास फळबागांचे मोठे नुकसान होऊ शकते. आता याच भीतीने बळीराजाच्या पोटात गोळा आलाय.

Rate Card

अवकाळी पावसाचा धसका कायम…
जत तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी सांयकाळी तुरळक स्वरुपात रिमझिम पावसाने हजेरी लावली. हा पाऊस पिकांना मारक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांनी चांगलाच धसका घेतलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.