जत | महिला शिक्षिकेला शिवीगाळ एकावर गुन्हा दाखल |

जत,प्रतिनिधी : उंटवाटी ता.जत येथील जि.प.शाळेतील शिक्षिका अनिता विद्याधर किट्टद (वय 45) यांना वाईटवगाळ शिवीगाळ केल्याप्रकरणी रविंद्र मधूकर पाटील रा.खोजानवाडी यांच्या विरोधात जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी,अनिका किट्टद ह्या जिल्हा परिषद शाळा उंटवाडी येथे शिक्षिका आहेत.गुरूवारी त्या नेहमीप्रमीणे सकाळी पाचवीच्या वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत असताना संशयित रविंद्र पाटील हा त्यांची पुतणी उत्कर्षा महेंद्र पाटील हीची तिचे पालक नसतानाही वही मागून घेत असा अभ्यास तपासयाचा असतोय काय म्हणत अनिता किट्टद यांना वाईटवगाळ शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा केला.याप्रकरणी रविंद्र पाटील यांच्यावर शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ आदी कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.