रुग्णसेवेला ईश्वरसेवा मानणारे : डॉ.विवेकानंद राऊत

0
Rate Card

ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करत रुग्णांची सेवा हिच ईश्वराची सेवा माणून संपूर्ण पणे सामर्पित भावनेने दुष्काळग्रस्त जतकराची सेवा अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिक भावनेने करणारे धन्वंतरी म्हणजेच डॉ.विवेकानंद जनार्दन राऊत आज त्यांच्या हॉस्पिटलचा दहावा वृध्दापन दिन त्यानिमित्त त्याच्या कार्याचा थोडक्यात आढावा.. 

सेवाभावी वृती या स्वभावाने अल्पावधीत रुग्णांना आपले पण सिध्द करणारे सर्वाच्या ह्रदयसिंहासनावर राज्य करणा-या डॉ.विवेकानंद राऊत यांच्या जीवन हॉस्पिटलला 9 वर्षे पुर्ण होत आहेत.

हा नऊ वर्षाचा प्रवास नक्कीच देदिप्यमान आहे.आपले प्राथमिक शिक्षा मंगळवेढा तालुक्यातील भोसे नंदेश्वर या भागात पूर्ण केल्यानंतर कर्नाटकातील विजापूर मधून वैद्यकिय शिक्षणाची पदवी पूर्ण केली.त्यानंतरच्या काळात सोलापूर,पुणे,सांगली लोणावळा याठिकाणी नामवंत डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली सराव पुरण  कल्यानंतर मोठ्या शहराकडे न धावता जत सारख्या ग्रामीण आणि दुष्काळी भागाची निवड करून 16 डिसेंबर 2010 रोजी जीवन हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे रोपटे लावले. ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय ज्ञानाचा फायदा व्हावा आणी त्यांना त्या माध्यमातून उत्तम दर्जाची आरोग्य सुविद्या मिळावी हाच निस्वार्थ आणि प्रामाणिक हेतू होता.9 वर्षापुर्वी लागलेले हे आरोग्य सेवेचे रोपटे शनिवारी 14 डिंसेबरला 10 व्या वर्षात पर्दापण करित आहे.या निमित्ताने जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर्सचे विनामुल्य आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीराली भूमिका : गेल्या 9 वर्षात सर्वच थरातील रुग्णांची सेवा डॉ.राऊत हे करीत असताना समाजातील अत्यंत गरीब रुग्ण या डॉक्टरांकडे उपचारासाठी जाऊ शकत नाहीत.आर्थिक विवेंचनेमुळे आजार अंगावर काढावा लागतो.बऱ्यांच वेळा यामुळे रुग्ण दगावतात.याला पायबंध बसावा,गरीब,होतकरू रूग्णांना जतमध्ये पुर्णपणे मोफत वैद्यकीय सेवा मिळावी.समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीच या महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीराचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान डॉ.राऊत यांनी केली आहे.

जीवन हॉस्पिटल दहाव्या वर्षात पर्दापण करत आहे.त्याचे औचित्य साधून जत अर्बन बँकेच्या मागे असलेल्या जीवन हॉस्पिटल मध्ये हे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे. सांगली,मिरज व जत तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ.शिरीष चव्हाण, डॉ.सुधीर शहा,डॉ.रविंद्र वाळवेकर,डॉ.विठ्ठल माळी,डॉ.प्रदिप कोरे,डॉ.सुनिल भोसले,डॉ.अक्षय पाटील हे प्रमुख डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत.मधुमेह,ह्रदयरोग,हाडाचे आजार,लहान मुलांचे आजार,कान-नाक-घसा,त्वचारोग,नेत्ररोग यांची तपासणी करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.