रामाण्णा जिवाण्णावर यांना पं.स.सभापती करावे : सागर लठ्ठे

जत,प्रतिनिधी : बिंळूर गणातील पंचायत समितीचे सदस्य रामाण्णा जिवाण्णावर यांना सभापती पदी संधी द्यावी अशी मागणी,एंकूडीचे युवक नेते सागर लठ्ठे यांनी केली आहे.
भाजपचे किंबहुना माजी आमदार विलासराव जगताप यांचे खंदे समर्थक असलेले रामाण्णा जिवाण्णावर हे जेष्ट सदस्य आहे.नव्याने जत पंचायत समितीचे सभापती खुले झाले आहे.जिवाण्णावर यांची सभापती म्हणून नेमणूक व्हावी.बिंळूर सोसायटीचे पंचवीस वर्षे चेअरमन,बिंळूर जिल्हा परिषद सदस्य अशा पदावर त्यांनी काम केले आहे. बिंळूर परिसरातील मोठा जनसमुदाय असलेले नेते म्हणून जिवाण्णावर यांची ओळख आहे.गेल्या 35 वर्षापासून राजकारणात असणाऱ्या जिवाण्णावर यांना प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे.शिवाय त्यांच्या राजकीय कार्याला न्याय देण्यासाठी त्यांना सभापती पदी संधी द्यावी,अशी मागणी सागर लठ्ठे यांनी केली आहे.