सांगली : अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातील अधिकारी यांनी जत येथील पिण्याचे बाटलीबंद पाण्याचे वेव्ह ब्रँड वितरण करणारे मे. हुसेन नदाफ यांच्या गोडावूनवर छापा टाकून विनापरवाना उत्पादन केलेले 87 हजार 440 रूपये किंमतीचे 4 हजार 373 लिटर बाटलीबंद पाण्याचा साठा जप्त केला. अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.श्री. चौगुले म्हणाले, पाण्याचे उत्पादन विजापूर येथील मे. राधालोक मिनरल्स कंपनी यांनी केल्याचे लेबलवरून दिसून आले. या प्रकरणी प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जत शहरातील हातगाडीवर अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या तपासणी करण्यात आल्या. त्यांना स्वच्छता ठेवण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.यामध्ये मे.एस.एल.बेकर्स केक्स स्वीटस, महाराणा प्रताप चौक जत, मे. संत किनाराम हॉटेल्स, मे. हैद्राबाद टी पॉईन्टस, मे. ओंकार स्वीटमार्ट, मे. ए-वन चायनिज सेंटर व मे. बालाजी बाजार सोलनकर चौक, जत येथे तपासणी करण्यात आली.ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी एस. एस. हाके व नमुना सहायक चंद्रकांत साबळे यांनी केली.