पराभवामुळे वैफल्यग्रस्त झाल्याने माजी आमदाराचे उपोषण | कॉग्रेस नेत्याचा आरोप

0

Rate Card

जत : माजी आमदार विलासराव जगताप जत तालुक्यात चालू असलेल्या सावकारी, गुंडगिरी, व इतर अवैध धंदे याच्यावर कारवाई करण्यासाठी उपोषणाला बसणार आहेत.हे म्हणजे चोराच्या उलट्या बोबा यातलाच हा प्रकार आहे,असा आरोप कॉंग्रेस नेते तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती संतोष पाटील,बाबासाहेब कोडग,पिराप्पा माळी,सुजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला.माजी आमदार विलासराव जगताप हे सत्तेत असताना तालुक्यात अतिशय भीषण दुष्काळ असतानाही शेतक-यांना पाणी देण्याची कोणतीही योजना त्यांनी केली नाही.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवलेला नाही.जनावरांच्या उपासमारीवेळी तत्कालीन शासनाकडे मदतीची कोणतीही मागणी केली नाही.चारा पाणी,पीकविमा हे प्रश्न अजिबात मांडले नाहीत विधानसभेत बोलण्याची संधी मिळाली असताना तालुक्यातील प्रश्न मांडण्याऐवजी निव्वळ मटका जुगार याबाबत प्रश्न उपस्थित करून नंतर गप्प राहिले.विलासराव जगताप यांचा निवडणुकीत पराभव झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन ते प्रशासनावर आरोप करत आहेत.प्रशासन निट वागत नाही हे विलासराव जगताप यांना आमदार असताना जाणवले नाही तर निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 15 दिवसांनी जाणवले मग त्यांनी 5 वर्षे काय झोपा काढल्या का हे सांगावे.तालुक्यातील जनतेला माहिती आहे,कि विलासराव जगताप यांच्या अनेक कार्यकर्त्याचे वाळूतस्करी,जुगार,मटका,गुंडगिरीचे उद्योग आहेत.त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ताकीद देऊन अवैध धंदे बंद करण्यास सांगावे व मग उपोषणाला बसावे.हे उपोषण म्हणजे निव्वळ फार्स असून प्रशासनावर मोर्चा काढण्यापेक्षा कार्यकर्त्यांना अवैध धंदे न करण्याबाबत एखादी प्रबोधनपर कार्यशाळा घ्यावी. जर उपोषणास बसवायचे असल्यास मनरेगामधील कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघड करून त्यावर कारवाई करण्यासाठी उपोषणास बसावे म्हणजे जनतेच्या हिताची गोष्ठ होईल,असाही आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.