जत : जतसह सांगली जिल्हातील विविध मागण्याच्या प्रस्तावावर कारवाई करावी,अशी आग्रही मागणी रेल्वे बोर्डाच्या बैठकीत सदस्य प्रकाश जमदाडे यांनी केली.रेल्वे बोर्डाच्या सदस्याची बैठक पुणे येथे संपन्न झाली.यावेळ जनरल मॅनेजर श्री.देऊसकर ,सचिव श्री मिश्राजी,रेल्वे बोर्ड सदस्य महेंद्र जगताप,सदस्य हेमंत टपाले व इतर सदस्य उपस्थित होते.गेल्या बैठकीत जमदाडे सांगली जिल्ह्यातील विविध नवीन मार्ग,नवीन रेल्वे गाड्या,थांबेसह प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती.त्यावर याही बैठकीत पाठपुरावा केला.
पुणे येथील रेल्वे बोर्डाच्या बैठकीत प्रकाश जमदाडे





