माडग़्याळची वाहतूक कोंडी संपविण्याचा पोलीसाचा पुन्हा प्रयत्न

0

Rate Card

जत/माडग्याळ : माडग्याळ ता.जत येथील जत-चडचडण मार्गावरील वाहतूक कोंडीबाबत गंभीर आरोप झाल्यानंतर अखेर पोलीसांनी शुक्रवारी बंदोबस्त लावत वाहतूक सुरळीत केली.माडग्याळ मधील वाहतूकीची गंभीर समस्येला उमदी पोलीस जबाबदार आहेत.हप्ते देऊन वडाप करणाऱ्या वडाप गाड्या थेट रस्त्यावर उभ्या केल्या जातात.त्याशिवाय रस्त्यावर कुठेही अस्तावेस्त लावली जाणारी वाहने,रस्त्यावरच बसणारे व्यापारी यावर पोलीसाकडून कारवाई झाल्याचे ऐकवत नाही.परिणामी पोलीसाचा धाकच संपल्याचा समज येथील वाहन धारकांसह व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पुढेही वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता नाही.वृत्तमानपत्रा मध्ये बातमी आल्यानंतर उमदी पोलीसांचे कर्मचारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरतात.एकदोन आठवडे वाहतूक सुरळीत होते.पुन्हा पोलीस गायब होतात,आणि वाहतूक कोंडी पुर्वरत होते.

हप्तेखोरीने पोलीसाचा धाक कमी होतोय

उमदी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे चालकाकंडून थेट हप्ते वसूलीमुळे पोलीसांची ओळख बदलत आहे.माडग्याळ येथे अवैध,कालबाह्य वाहने थेट रस्त्यावर उभे राहून जनावरासारखे माणसे कोबून वडाप व्यवसाय करतात.विशेष म्हणजे हे येथील चौकीला नेमलेल्या पोलीसांना दिसत नाहीत.माजी आमदार विलासराव जगताप यांनी पोलीसाच्या अशा कारभाराविरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे.

माडग्याळ मधील वाहतूक कोंडी संपविण्यासाठी पोलीसाचे प्रयत्न मात्र वडाप वाहने रस्त्यावरचं

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.