बोगस डॉक्टर प्रणोय मलीकला शिक्षा जत न्यायालचा निकाल : तीन वर्ष सक्तमजूरी ,10 हजार दंड

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : डफळापूर ता.जत येथे कोणतीही पदवी न घेता बोगस दवाखाना थाटून डॉक्टरकी करणाऱ्या बोगस डॉक्टर प्रणोय उर्फ अविक परिमल मलिक याला दोषी ठरवत तीन वर्ष सक्तमजूरी, दहा हजार रूपयाचा दंड व दंड न भरल्यास चार महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावत जत न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल दिला.सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता संतोषकुमार पताळे यांनी सक्षम युतीवाद केला.

अधिक माहिती अशी,डफळापूर ता़.जत येथे डॉ.प्रणोय मलिक यांने वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठीचा शासनाचा कोणताही परवाना अथवा वैद्यकीय कौन्सीलकडे नोंदणी अथवा परवाना नसताना दवाखाना थाटला होता.त्यांचा या दवाखान्यावर बोगस डॉक्टर विरोधी पथकाने 26/3/2013 ला दुपारी एक वाजता छापा टाकला असता त्यांना 749 रुपये किंमतीचे अँलोपेथिक औषधे,व्यवसायासाठी लागणारे साहित्य,सामुग्री बाळगून स्व:ताच्या फायद्याकरिता वैद्यकीय व्यवसाय करताना आढळून आला होता.त्यानुसार त्यांच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 कलम 33(1) प्रमाण त्यांच्या विरोधात जत पो.ठाणे येथे गु.र.नं.2/2013 अन्वये फिर्यादी डॉ.दत्तात्रय राजाराम पाटील(वैद्यकीय अधिकारी सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.त्यांचा तपास तपासिक अधिकारी हवलदार व्ही.एन.पवार यांनी

करत मे कोर्टात दोषारोप पत्र दाखल केले होते.यात सरकारी पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी,साक्षीदार,वैद्यकीय अधिकारी,औषध निरिक्षक सौ.जयश्री सौंदर्य,तापासिक अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.सर्व साक्षीदारांच्या साक्षी पुरावा गाह्य धरून तसेच कागदोपत्री शाबित झालेला पुरावा यावरून सदरील गुन्हा आरोपींने केल्याचे निष्पन्न व शाबित होत असल्याचा महत्वपूर्ण युक्तीवाद सरकारी अभियोक्ता संतोषकुमार पताळे यांनी केला.त्यानुसार जत येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ.सुशिला आर.पाटील यांनी आरोपी प्रणोय उर्फ अविक परिमल मलिक याला महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम कलम 33(2)अन्वये दोषी धरून तीन वर्ष सक्त मजूरी,व दहा हजार रूपयाचा दंड व दंड न भरल्यास चार महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावत शिक्षा ठोठावली.सदरकामी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता पताळे,जितेंद्र पाटील,यांनी काम पाहिले.त्यांना पो.कॉ.शशिकांत पाटील यांनी सहकार्य केले.

जामीन मिळाल्यानंतर डॉ.मलिकने बेंळूखीत थाटला बोगस दवाखना

बोगस डॉक्टर डॉ.प्रणोय उर्फ अविक परिमल मलिक या मुर्दाड माणसाने चार वेळा कारवाई होऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा बेंळूखीत बोगस दवाखाना थाटला आहे.शिक्षा झाल्यानंतर अपिलासाठी मिळालेल्या जामिन काळातही तो बेंळूखी रूग्णावर बोगस उपचार करत आहे.थेट न्यायालयाला आवाहन देणाऱ्या या बोगस डॉक्टरला आतातरी रोकणार का असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.डफळापूर परिसरात सुमारे असे पाच बोगस डॉक्टर आपला व्यवसाय करत असून याला तालुका आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी,डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी पाठिशी घालत असल्याचे आरोप होत आहेत.त्यामुळे यापुढे बोगस डॉक्टर मलिक अशा पध्दतीने उपचार करताना सापडला तर त्याला जागा देणारे दुकान मालक,संबधित विभागाचे वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांना जबाबदार धरत कठोर कारवाई होणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.