प्रधानमंत्री घरकुल योजनेचा फज्जा | निधीअभावी कामे रखडली

0
Rate Card

बालगाव,वार्ताहर : शासनाने गोरगरीब जनतेला कायमचा आश्रम मिळावा यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजना अमलात आणली मात्र या योजनेचा जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जत तालुक्‍यातील हळ्ळी गावात या योजनेचा फज्जा उडालेला आहे.शासनाने घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट बिल जमा करते मात्र हळ्ळी गावातील ग्रामसेवक घरकुल कामाचे फोटो व इतर माहिती वरिष्ठ कार्यालयास वेळेत देत नसल्याने बिले रखडली आहेत.एखादा प्रस्ताव बिलासाठी वरिष्ठ कार्यालयास पाठवल्यास आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत असल्याचा ग्रामसेवकाकडून सांगण्यात येत आहे.मात्र,बांधकामाचे फोटो व इतर कागदपत्रे देऊन दोन महिने उलटले अद्यापही बिल मिळाले नसल्याने बिल मिळणार तरी कधी या चिंतेत येथील नागरिक आहेत.येथील ग्रामसेवकाने तर चक्क घरकुल कागदपत्रे व बांधकाम फोटो गोळा करण्याचे काम एका खाजगी उमेदवाराकडे सोपवली आहे.या खाजगी उमेदवाराकडे जे लाभार्थी फोटो,  कागदपत्रे व आर्थिक तडजोड करतील अशाच लाभार्थ्यांना बिले मिळत असल्याचे आरोप होत आहेत.ज्या लाभार्थ्यांना अद्याप दुसरे बिल मिळाले नाही यात संबंधित ग्रामसेवकाचा देखील सहभाग असल्याची शक्यता लाभार्थी व्यक्त आहेत.

हळ्ळी ता.जत येथील निधी रखडल्याने कामे रखडली आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.