मंत्री उपसमितीसमोर जिल्ह्याच्या नुकसानीचा आढावा सादर करणार | पालकमंत्री सुभाष देशमुख

0

      सांगली :  अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकरी अडचणीत आला आहे. द्राक्ष, डाळिंब, शेवगा, बाजरी, मका, भूईमूग, हायब्रिड, ज्वारी, कोबी, मिरची, सोयाबिन, उडिद, टोमॅटो आदी पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकासान झाले आहे. याबाबतची वस्तुस्थिती मुंबई येथे होणाऱ्या मंत्री उपसमितीच्या बैठकीत सादर करणार असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात येईल व शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात येईल. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन सर्वोतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर राहिल, अशी ग्वाही सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज शेतकऱ्यांना दिली.पालकमंत्री सुभाष देशमुख जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी, नेलकरंजी, खानापूर तालुक्यातील करंजे, तासगाव तालुक्यातील बिरणवाडी, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधून शासन आपल्या पाठीशी असून लवकरात लवकर आपल्याला मदत मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही दिली.यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नजरअंदाजे पाहणीनूसार 55 हजार 136 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्या दिलासा देण्यासाठी नुकसान क्षेत्राचे पंचनामे गतीने करण्यात येत असून येत्या दोन दिवसात पंचनामे पुर्ण होतील. ज्या ठिकाणी पंचनाम्याला उशिर होत आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी छायाचित्रे काढून ती अपलोड करावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  तसेच विमा कंपन्यांना नुकासान भरपाई देण्यासाठी शासनने केलेले पंचनामे ग्राह्य धारवेत अशा सूचना देण्यात आले असल्याची माहितीही पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.मुंबई येथे 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मंत्री उपसमितीच्या बैठकीत जिल्ह्यातील ही वस्तुस्थिती मांडण्यात येणार असून कोणत्या पिका किती नुकसान भरपाई द्यायची याचाही निर्णय या बैठकीत होईल असे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मतदीसाठी 10 हजार कोटींची तात्पुर्ती तरदूत करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Rate Card

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.