डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील गाव भागात डांसाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले होते.या डांसाच्या चाव्यामुळे सुमारे 10 जणांना डेंगूची लागण झाली होती.वार्ड 1 मध्ये सर्वाधिक फटका बसला होता.येथील डेंगू झालेल्या पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत.यांचे वस्तूनिष्ठ वृत्त दैंनिक संकेत टाइम्सने रवीवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते.यांची गंभीर दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने सुट्टीचा दिवस असतानाही धुर फवारणी,औषधे टाकण्यास सुरूवात केली आहे. या वार्डाचे कार्यशील सदस्य मुरलीधर शिंगे यांच्यासह ग्रामसेवक एस.एस.कोरे उपस्थित होते.औषध फवारणी बरोबर तुंबलेल्या गटारी,डबकी यांची स्वच्छता करण्याची गरज आहे.
आरोग्य विभाग सुस्तचडफळापूरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी कोट्यावधी रूपये खर्चून उभे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी याबाबत गंभीर नाहीत.गेल्या पंधरा दिवसापासून डेंगूचे रुग्ण सापडत असतानाही आरोग्य विभागाकडून सर्व्हेशन, उपाययोजना होत नसल्याचे आरोप आहेत,कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देतात.रवीवारीही एवढ्या संख्येने रुग्ण सापडले असतानाही तेथे आरोग्य विभागाकडून कोणतीही कारवाई झाली नाही.जिल्हाधिकारी यांचे सक्त आदेश असतानाही डफळापूराचा आरोग्य विभाग सुस्त असल्याचे समोर आले.





