माजी आमदार अँड.जयंत सोहनी यांचे निधन

0
99

जत,प्रतिनिधी : जत तालुक्याचे माजी आमदार अँड.जयंत ईश्वर सोहनी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते 92 वर्षांचे होते.मंगळवारी जत येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अँड.सोहनी यांनी जत मतदार संघातून दोनवेळा प्रतिनिधित्व केले होते. पेशाने वकील असलेले सोहनी हे मूळचे आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी गावचे होते.जत तालुक्यांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रदीर्घकाळ काम केले.श्रीमंत विजयसिंह राजे यांनी त्यांना राजकारणात आणले.माजी मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील यांचे ते कट्टर समर्थक होते.बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी मंत्रीपद नाकारून दादांची साथ सोडली नाही.  

अँड.सोहनी यांनी जत न्यायालयात अनेक वर्षे वकीलीही केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा प्रा.डाॅ.नितीन सोहनी,सून नातवंडे असा परिवार आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here