माणिकनाळ मध्ये 5 हजाराची लाच स्विकारताना रोजगारसेवकांला पकडले

जत,प्रतिनिधी : प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर घराचे दोन हप्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी 5 हजार रूपयाची लाच मागितल्याप्रकरणी माणिकनाळ ग्रामपंचायतीचा रोजगार सेवक भिमाशंकर मल्लाना मेडेदार यांला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.माणिकनाळ येथील तक्रारदारांच्या वडिलांना एक लाख वीस हजार रूपये मंजूर झाले आहेत.त्यातील बँक खातेवर दोन हप्त्याचे बिल जमा करण्यासाठी रोजगार सेवक मेडेदार यांनी पाच हजार रूपयाची मागणी केली होती.त्यांसदर्भातील तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. ब्युरोच्या कार्यप्रणाली प्रमाणे पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार माणिकनाळ येथे सापळा लावला होता.त्यात तक्रारदाराकडून मेडेदारला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.त्यानुसार लाचलुचपत विभागाने उमदी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.रोजगार सेवक भिमाशंकर मेडेदार यांला ताब्यात घेण्यात आले आहे. उपअधीक्षक प्रशांत चौगुले,पोलीस निरिक्षक गुरूदत्त मोरे यांच्या पथकांनी कारवाई केली.
