जतेत भाजपच्या चौघाही इंच्छूकाचा प्रचार सुरू | पक्ष श्रेष्ठीची गोची : कुणाला लागणार लॉटरी |

0

Image result for kamal ful

जत,प्रतिनिधी :भाजपच्या उमेदवारीचा पत्ता नाही,मात्र जतेत इच्छुक उमेदवारांनी थेट प्रचार सुरू केल्याने मोठी गोची झाली आहे.जत तालुक्यात भाजपकडून चारजण प्रंबळ इच्छुक आहेत.त्यातील चौघांनाही उमेदवारी मिळण्याची खात्री असल्याच्या चर्चेने यातील चौघांनीही थेट पंतप्रधान,भाजपाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री व वरिष्ठ नेत्यांचे फोटो लावत चारचाकी वाहने लावत लाऊटस्पिकर द्वारे प्रचार सुरू केला आहे.विद्यमान आमदार विलासराव जगताप यांनीही विकासकामाचा रथाद्वारे यापुर्वीची उमेदवारी आपल्याला मिळणार हे गृहीत धरून प्रचार भेटीगाठी सुरू केल्या आहेत.जत भाजपचे दुसरे इच्छुक पर्यटन महामंडळाचे सदस्य डॉ.रविद्र आरळी,रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे,शिक्षण सभापती तम्माणगोंडा रवीपाटील यां तिघांनी थेट वाहनाद्वारे स्वंतत्रपणे प्रचार सुरू केला आहे. त्याशिवाय वरिष्ठ नेत्यांच्या भेटी,तालुक्यातील पदाधिकारी,मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.यातील चौघांनाही उमेदवारी मिळेल मलाच मिळेल,या उद्देशाने तयारी सुरू केली आहे. मात्र भाजपा पक्ष श्रेष्ठी अथवा कोणत्याही कमिटीकडून कोणाचीही अधिकृत्त घोषणा केलेली नाही.प्रत्येकांनी आपल्या परीने वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत तयारी चालू केली आहे. मात्र या चौघाच्या संघर्षात भाजपच्या हक्काची जत विधानसभा जागा जातेय कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.चौघा इंच्छूकापैंकी कोणाला पक्षश्रेष्ठी उमेदवारी देणार व कोण बंड करणार हा तालुक्यात औसुक्याचा विषय बनला आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.