जत,प्रतिनिधी : जत शहरात नगरपरिषदेकडून प्रभाग क्रमांक 2 मधील शिर्के गल्ली,दत्त कॉलनी मध्ये अनियमित तेही आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे.त्यातही गटारीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी मिसळून पाणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगसेवकाच्या दणक्यानंतर अखेर या गटारीतील कचरा काढून गटारी प्रवाहित करण्यात आल्या आहेत. नगरपरिषदेला वारवांर कल्पना देऊनही समस्या सुटत नसल्याने या प्रभाग मधील सत्ताधारी कॉग्रेसच्या नगरसेविका सौ.गायत्रीदेवी शिंदे व संतोष कोळी संतप्त झाले असून, समस्या सुटेपर्यत नगरपरिषदेच्या सर्व सभावर बहिष्कार टाकत असल्याचे त्यांनी निवेदन दिले होते.त्यावर दुसऱ्यादिवशी मुख्याधिकारी यांनी कारवाई करत जेसीबी मशीन,कर्मचारी पाठवत या प्रभागातील विजापूर-गुहागर मार्गाकडेच्या गटारी खुल्या केल्या.कुठून नळपाणी पुरवठा पाईपमध्ये गटारीचे पाणी जाते यांचाही शोध घेण्यात आला.
या कामामुळे काहीअंशी नागरिकांची सुटका होणार आहे, मात्र गटारीतून काढलेला व रस्त्यावर पडलेला कचरा तातडीने हटविण्याची आता गरज बनली आहे.
जत शहरातील प्रभाग 2 मधील गटारीतील कचरा काढण्यात आला.