माडग्याळ | मध्ये आणखी दोन महिलांना डेंग्यू |

0
6

माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ ता.जत येथे आणखी दोन महिलांना डेंग्यू लागण झाल्याचे समोर येत आहे.मायथळ ता.जत येथील महिला नंदा बाई शिवशरण(वय 40)यांना व अन्य एका महिलेस डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर माडग्याळ येेथे उपचार घेत आहेत.यापुर्वी डेंग्यू झालेल्या पारूबाई दत्तात्रय सांवत यांच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत.त्याची प्रकृत्ती सध्या स्थीर आहे. माडग्याळ,जत,उमदीत अनेक तापाचे रुग्ण आढळले आहेत.शासकीय व वेगवेगळ्या खाजगी दवाखान्यात रुग्ण दाखल आहेत.परिसरातील माडग्याळसह मायथळ,गुड्डापूरसह परिसरात डेंग्यू सदृष्य तापाची साथ आली आहे.घरटी तापाचे रुग्ण आढळत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.माडग्याळ मध्ये गेल्या आठवड्यापासून डेंग्यू व चिकनगुनिया धुमाकूळ घातला असतानाही आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.डासा रोकण्यासाठी प्रतिबंधक औषधे फवारावेत अशी मागणी होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here