जत | पायघसरून विहिरीत पडल्याने नवविवाहितेचा मुत्यू |

जत,प्रतिनिधी : कुणीकोणूर ता.जत येथील नवविवाहितेचा पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून मुत्यू झाल्याची घटना रवीवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.सुवर्णा निवृत्ती व अविनाश टोणे (वय-19)रा.मुळ गाव रेड्डे,ता.मंगळवेढा,सध्या कुणीकोणूर असे मयत विवाहितेचे नाव आहे.
याबाबत जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी, मयत सुवर्णा हिचा दिड महिन्यापुर्वी निवृत्ती टोणे यांच्याबरोबर विवाह झाला होता.तिचे पती निवृत्ती पुणे येथे खाजगी नोकरीस आहेत.रविवारी सकाळी सुवर्णा व सासू अंजना या दोघी मिळून खैराव ता.जत येथील शेतात खुरपण्यासाठी गेल्या होत्या.तहान लागली म्हणून सुवर्णा लगतच्या एकनाथ टोणे यांच्या सामाईक विहिरीत गेल्या.पाणी भरत असताना त्याचा पाय घसरून त्या विहिरीत पडल्याने बुडाल्या.बराच वेळ सुवर्णा न आल्याने सासू अंजना विहिरीकडे आल्यावर हा प्रकार समोर आला.सासू अंजनाने आरडाओरडा केल्यानंतर शेजारचे लोक धावले.त्यांनी सुवर्णाला विहिरी बाहेर काढले.मात्र तोपर्यत सुर्वणाचा मुत्यू झाला होता.खैरावचे पोलीस पाटील रामचंद्र पाटील यांनी जत पोलीसात वर्दी दिली.अधिक तपास हवलदार संजय माने करत आहेत.
