उटगीत तरूणाचा खून ? उटगी-बेळोडगी रस्त्यावर संशास्पद मृत्तदेह व दुचाकी आढळली

0

उमदी,वार्ताहर : उटगी ता.जत येथील उटगी ते बेळोंडगी रस्त्यावर एका तरूणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.शिवाजी मोहन खरजे वय 28,रा.सोन्याळ असे मयत तरूणाचे नाव आहे.बुधवारी रात्रीत ही घटना घडल्याचा अंदाज आहे.मयत मोहन यांच्या भाऊ तानाजी खर जे यांच्या फिर्यादीवरून उमदी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घटनास्थंळ व पोलीसांकडून माहिती अशी,सोन्याळ येथील शेळ्या मेढ्याचा व्यापार करणारा शिवाजी खरजे हा बुधवारी सायकांळी 6 वाजण्याच्या सुमारास उटगीच्या पुढे एकाच्या शेळ्या आहेत.त्यांचा व्यवहार करून येतो,असे सांगून घरातून बाहेर पडला होता.तो रात्री घरी परत आला नाही.गुरूवारी उटगी ते बेळोंडगी रोडपासून हळ्ळी रस्त्याला जोडणाऱ्या बिज्जरगी यांच्या मळ्याजवळ मोटार सायकलसह शिवाजी यांचा मयत स्थितीतील मृत्तदेह या परिसरात आढळून आला. गावातील नागरिकांनी याबाबत उमदी पोलीसांना कळविले.घटनेची माहिती मिळताच सा.पोलीस निरिक्षक दत्तात्रय कोळेकर,उपनिरिक्षक श्री.दांडगे यांनी घटनास्थळी भेट देत,पंचनाना करून मृत्तदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.घटनास्थांळाची संशास्पद परिस्थिती पोलीसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मयत शिवाजी खरजे यांच्या कुंटुबियांनी घटनास्थळी आक्रोश केला,तर शिवाजी यांचा घातपात झाल्याचा संशय भाऊ तानाजी खरजे यांनी व्यक्त केला आहे.

मोटारसायकलची चावी खिशात

Rate Card

मयत शिवाजी खरजे यांचा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले.मात्र मृत्तदेहाच्या बाजूला दुचाकी व्यवस्थित  उभी केली होती.कुठेही अपघात झाल्याची वण्र दुचाकीवर नव्हते.तर घटनास्थळी देशी दारूची बाटली व दुचाकीची चावी मयत शिवाजी यांच्या खिशात सापडल्याने शिवाजीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पोलीसाकडून तपास होणे गरजेचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.