जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील कुंभारी येथे गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या गांज्या शेतीवर जत पोलीसांनी छापा टाकला.
गेल्या अनेक दिवसापासून येथे सुरू असलेला हा गांज्या तस्करी शोधायला पोलीसांना गांज्या तस्करातील एकजण फित्तूर होण्याची वाट पहावी लागली,हे विशेष..
जत तालुक्यातील कुंभारी,शेगाव परिसर गांज्या,दारू,चंदन तस्करीचे माहेरघर बनले आहे.येथे यापुर्वी दारू,चंदन,गांज्या शेतीवर पोलीसांनी छापा टाकला आहे.मात्र छाप्यानंतर या तस्करांनी आपला धंदा दुप्पट वाढविल्याची चर्चा आहे. त्यामुळे यामागचे गौडबंगाल हाही प्रश्न उपस्थित होत आहे.येथून तालुक्यासह राज्यभर गांज्याची विक्रमी होत असल्याने समोर आले आहे. येथे पिकविलेला गांज्या चोरीच्या मार्गाने कोल्हापूर अन्य ठिकाणी राजरोसपणे पोहचत होता.यांची साधी कुणकुणही पोलीसांना यापुर्वी पोलीसांना लागली नव्हती.या तस्करीचा भांडाफोड तस्करातील उत्पन्नाच्या स्पर्धेतून झाला.त्यातील एकजणाने पोलीसांना टीप दिल्यानंतर हा प्रकार समोर आला.त्यामुळे या परिसरात सुरू असलेल्या या तस्करांना कुणाचे बंळ आहे,हे थेट चौकाचौकात बोलले जात आहे.पोलीलाची चाणाक्ष नजर बहुदा याकडे पडत नसल्याने वास्तव आहे.





