जत | शहरात वाळू तस्करी जोमात | दररोज 25 डंपर वाळू येते शहरात |

0
Rate Card

 अधिकारी,तलाठी फित्तूर ?

जत,प्रतिनिधी : जत शहरात राजरोसपणे वाळू तस्करी सुरू आहे.शहरातील विविध भागात सुमारे 25 डंपर बेकायदा वाळू विक्री केली जात आहे. शहरातील प्रमुख चौकात वाळूचे ढिगारे ओतले जात असतानाही शहरात राहणाऱ्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांचे याकडे लक्ष जात नाही हे विशेष आहे.शहराच्या कामगिरीवर असणारे अधिकारी, तलाठी,कोतवाल वाळू तस्कराला फित्तूर झाल्याची चर्चा आहे.

तालुक्यात कुठेही वाळूचे टेंडर झालेले नसताना शहरात दररोज 25 डंपर वाळू येतेच कसे हा संशोधनाचा मुद्दा आहे.शहरातील अगदी प्रमुख रस्त्याकडेला या वाळूचे ढिगारे महसूल विभागाचा कारभार चव्हाट्यावर आणत आहेत.प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या चुप्पीने वाळू तस्करांना रान मोकळे झाले आहे.तर ज्यांच्यावर हे रोकायची कामगिरी आहे.ते झारीतील शुक्रचार्य मोठ्या रक्कमा घेऊन वाळू तस्करांना परवाने देत असल्याची चर्चा आहे.

तालुक्यात वाळू तस्करी रोकणारी यंत्रणा सुस्तावली आहे.कधीतरी जुजुबी कारवाई करून महसूल विभाग आपली पाठ थोपटून घेत आहे.मात्र शहरात दररोज हम रस्त्यासह उपनगरात पडणारे वाळूचे ढिगारे या यंत्रणेच्या अपयशाचे फलित बनले आहे.स्वत:कृत्यव्यदक्ष म्हणून घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्षामुळे वाळू तस्कर या भागाचे वाळवंट बनविल्याशिवाय राहणार नाहीत ऐवढे निश्चित…

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.