म्हैसाळ पाणी व महामार्ग कामासाठी रिपाई आक्रमक
जत,प्रतिनिधी : पावसाळ्याच्या दिवसात महापूर येऊन कृष्णा नदीचे वाया जाणारे पाणी हे म्हैशाळ योजनेतून दुष्काळी जत,आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये सोडून बंधारे,साठवण व पाझर तलाव भरून घ्यावेत या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी बुधवार दि.28 ऑगस्ट रोजी जत शहर बंद करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे यांनी तहसीलदार जत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
रिपाईच्या जिल्हा उपाध्यक्षपदी विकास सांबळेवायफळ ता.जत येथील विकास सांबळे यांची रिपाईच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सांगली येथे झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत राज्य सचिव विवेक कांबळे व जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्याहस्ते सांबळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्याच्या सिमेवर असलेला जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती कायम आहे. तालुक्यात पर्जन्याचे प्रमाण कमी असल्याने तालुक्यातील 24 साठवण तलाव व तीनशेवर पाझर तलाव अपवाद वगळता पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. शेती,पिण्यासह जनावरांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने माणसाचे व जनावराचे पाण्याअभावी हाल होत आहेत. तालुक्यात ऐन पावसाळ्यात 22 जनावरांच्या चारा छावण्या सुरू असून 75 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे.ही दाहकता कमी करण्यासाठी म्हैसाळ योजना बारामाही चालू करावी,जत शहरातून जाणाऱ्या विजापूर- गुहागर या राष्ट्रीय मार्गाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याने या कामाच्या विलंबामुळे जत शहरात वारंवार वाहतूक कोंडी होऊन छोटे मोठे अपघात होत आहेत त्यामुळे हे काम युद्ध पातळीवर करण्यात यावे,राष्ट्रीय महामार्गावर जत एम.आय.डी.सी.ते श्री.बसवेश्वर चौक (वळसंग रोड) येतपर्यंत रस्त्यावर मधोमध दुभाजक बसवावे. शहरातून जाणारे डाॅ. आरळी हाॅस्पीटल ते छत्रपती संभाजी राजे चौक रस्त्याची दुरूस्ती करावी. तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगरकडे जाणारे रस्त्यावर बंदिस्त गटार व सिडी वर्क करावे.
रस्त्याचे बाजूने नव्याने सुरू असलेल्या गटारीच्या कामात स्टीलचा वापर कमी केल्याने हे काम निकृष्ठ दर्जाहीन झाल्याने या कामाची चौकशी करावी. जि.प.मराठी शाळा नंबर एक व दोन या शाळेपासून हिंदू स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता दुरूस्त करावा. शिवाजी महाराज पुतळा ते पेठेतील मारुती मंदिर पर्यंतच्या दर्जाहिन कामाची चौकशी करावी. जत विद्यानगर येथील संभाजी भोसले घर ते ईदगाह मैदान या दर्जाहिन व निकृष्ठ कामाची चौकशी करावी तसेच ठेकेदार मठ यानी त्यांच्या नातेवाईकांच्या मर्जी खातर मठपती यांच्या घराजवळ सिडी वर्क न करता सिमेंट पाईपा घालून ते पाणी बिगरशेती प्लाॅट मध्ये सोडून नागरिकांना त्रास दिला आहे.त्याचीही चौकशी करावी. जत गावकामगार कार्यालय या ठिकाणी पूर्णवेळ सहाय्यक तलाठ्याची नेमणूक करावी. दिलीप इंगोले घर ते स्टेट बॅंक ऑफ इंडिया पर्यंतचा रस्त्याचे काम मंजूर करावे. जत नगरपालिकेने लाभार्थ्यांचे शौचालयाचे राहीलेले अनुदान त्वरित द्यावे.या मागण्यासाठी दिनांक 28 ऑगस्ट रोजी जत शहर बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जत तालुक्यातील विविध मागण्याचे निवेदन देताना रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे व पदाधिकारी