जत | दुष्काळ हटविण्यासाठी उपाययोजना करा | प्रकाशराव जमदाडे |

0

 म्हैसाळ योजना व तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी सोडा

जत,प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पूर्व भागातील गांवाना तूबची – बबलेश्वर (कर्नाटक राज्य) योजनेतून पाणी द्यावे व म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून तालुक्यातील सर्व तलाव,बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशराव जमदाडे यांनी केली आहे.जत तालूका कायमचा दुष्काळी असून जुलैपर्यत 113 ट्रँकरने 96 गावे व 752 वाड्यावत्यांना पिण्यासाठी पाणी पुरवले जात होत.आजही ही परिस्थिती कायम आहे.ऐन पावसाळ्यात पूर्व भागातील 59 गावे 440 वाड्यावस्त्याना 60 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. सध्या तुबची बबलेश्वर (कर्नाटक राज्य तिकोटा जवळून) योजनेचे पाणी प्रवाहाने कर्नाटक कॅनॉल मधून ओव्हरफ्लो होवून कागनरी (ता.जत)येथील 1 पाझर तलाव व 5 सिमेंट नाला बांध भरून तिकोडी नं 2 तलावापर्यंत पोहचले आहे.जुलै ते नोंव्हेबर अखेर या योजनेतून पाणी देणेची तरतूद आहे.सध्या नदीतून बरेच पाणी खाली वाहून जात आहे.दि.06/05/2017 रोजी कृष्णा खोरे महामडळाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व उपअभियंते यांनी प्रत्यक्ष या योजनेची पहाणी करून कर्नाटक अभियत्यांशी चर्चा केली आहे.जत तालुक्यात नैसर्गिक उताराने या योजनेतून पाणी देणे शक्य आहे,असे त्यांनी सांगितले आहे.आजही पूर्व भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू आहेत.कर्नाटक शासनास विनंती करून सदर योजनेतून पाणी सोडलेस नैसर्गिक प्रवाहाने तिकोडी,भिवर्गी, मोरबगी करजगी, बेळोंडगी,बालगाव, हळळी, सुसलाद पर्यंत तर दुसऱ्या बाजूने धुळकरवाडी, आसंगी(तुर्क),मोटेवाडी,पांडोझरी या गावाबरोबरच बोर नदीत पाणी जाणार आहे.त्यातून संख मध्यम प्रकल्प तर भिवर्गी व मोटेवाडी (पाडोझरी) साठवण तलाव भरून घेता येणे शक्य आहे. यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या व जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार आहे. याबाबत मी स्वतः यापूर्वी नोव्हेंबर 2018 मध्ये जतचे प्रातांधिकारी व जिल्हाधिकारी सांगली यांना 1 रूपयेही खर्च न करता जत तालुक्यात नैसर्गिक प्रवाहाने पाणी येऊ शकते. याचा प्रस्ताव व नकाशा दिलेला आहे.याचा गार्भिंर्याने विचार करावा तसेच कर्नाटक राज्यास आपण कृष्णा नदीतून 2015-16 व 2016-17 मध्ये 4.00 टी.एम.सी पाणी दिलेले आहे.तर नदीला आलेल्या पुराचे मोठ्या प्रमाणात पाणी कर्नाटकात गेले आहे.याचा विचार करून कर्नाटक शासनास सध्या किमान 1 टी.एम.सी पाणी समूदृ हट्टी व टक्कलगी औढ्यातून सोडण्यास विंनती करावी ही आग्रहाची मागणी आहे.तसेच कोकणात अतिवृष्टी झालेने कोयना, चादोली धरणातून जवळपास 80 ते 90 टीएमसी पाणी वाहवून गेले आहे. जत तालुका अद्याप कोरडा आहे.आजही जनावरासाठी छावण्या व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू आहेत.म्हैसाळ योजनेचे वीज बील टंचाई किंवा मदत व पुनर्वसन मधून भरून योजना त्वरीत चालू करून लाभ क्षेत्रातील तलाव,बंधारे भरून द्यावेत.म्हणजे दुष्काळाची तीव्रता कमी होईल व भविष्यात योजनेवर ताण पडणार नाही.म्हैशाळ योजना चालू केल्यास जत तालुक्याचा पश्चिम, उत्तर व दक्षिण भागाला फायदा होईल.त्याचबरोबर तुबची बबल्लेश्वर पुर्व भागाला पाणी देण्याची त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी जमदाडे यांनी केली आहे.त्यासंदर्भात जमदाडे संबधित विभागाचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी,यांना भेटणार आहेत.जत पुर्व भागातील तुबची-बबलेश्वर योजनेतून आलेल्या पाण्याची पाहणी करताना प्रकाशराव जमदाडे,शिवाप्पा तांवशी व स्थानिक पदाधिकारी

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.