जत,प्रतिनिधी : जत शहरातील विजापूर-गुहागर महामार्गावर गटारी बांधल्या नसल्याने गटारीतील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहेत.त्यामुळे लगतच्या रहिवाशी व दुचाकी चालकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
जत शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या धिम्या गतीने सुरू आहे.रस्ता होणार असल्याने रस्त्याकडेच्या गटारीकडे दुर्लक्ष होत आहे.स्टँडपासून आरळी कॉर्नर पर्यत मार्गाच्या दोन्ही बाजूच्या गटारी तुंबल्या आहेत.त्यामुळे बनाळी चौक,निगडी चौकात गटारीतील सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे.त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.त्यात पाणी रस्त्यावरील खड्ड्यात उभे राहून रस्ता धोकादायक बनला आहे.यामुळे अनेक दुचाकी घसरून अपघात झाले आहेत.खरे तर महामार्गाचे काम करताना गटारीच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे होते.मात्र मुख्य रस्ता करण्यात ठेकेदार कंपनी धन्यता मानत आहे.
जत शहरातील विजापूर-गुहागर मार्गावर गटारीचे पाणी असे रस्त्यावरून वाहत आहे.





