उमदी | दुचाकी अपघातात गिरगावचा तरूण ठार |
उमदी,वार्ताहर : गिरगांव – लंवगा रस्त्यावरील दुचाकी अपघातात अनिल सावळाराम गोकोते (वय 25, रा गिरगांव) हा ठार झाला. घटनेची नोंद उमदी पोलिसात रात्री उशिराने झाली आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी,गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अनिल गोकोते हा शंकर अर्जुन गोकोते यांची मोटारसायकल घेऊन गिरगाव – लवंगा रस्त्यावरून जात असताना अचानक कुत्रा आडवा आल्याने मोटारसायकल घसरून अपघातात झाला. त्यावेळी अनिल याचे डोके रस्त्यावर आपटले त्यांच्या डोक्यास गंभीर धक्का बसल्याने ते जागीच ठार झाले.या घटनेची फिर्याद अशोक सावळाराम गोकोते यांनी उमदी पोलिसात दिली.
