जत | डॉ.आरळींच्या उमा चँरिटेबल ट्रस्टचा पूरग्रस्तांना मदतीचा हात |

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सतत सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या डॉ.रविंद्र आरळी यांच्या उमा चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांगली येथील पूरग्रस्तांना वैधकीय व खाद्यान्नाची मदत पुरविण्यात येत आहेत.

जत भाजपचे नेते डॉ.आरळी यांच्या उमा चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने सतत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सुरु असते.तालुकाभर या माध्यमातून नागरिकांना मदत पुरविली जाते.गेल्या आठ दिवसात सांगलीत आलेल्या पुराने बेघर झालेल्या नागरिकांना डॉ.आरळी यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या आरळी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची वैधकीय पथके पूरग्रस्तांना मदत करत आहेत.त्याशिवाय पुरग्रस्तांना खाद्यान्न वाटप करण्यात येत आहे. ट्रस्टचे डॉ.रविंद्र आरळी स्वत: वैधकीय कँपवर थांबून रुग्णांची तपासणी करून औषध उपचार करत आहेत.त्याशिवाय मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टरांची टीम सध्या सांगली येथे पूरग्रस्तांना वैधकीय मदत देत आहे.

पुरग्रस्तांना प्रती बांधिलकी जपत त्यांनी सुरू केलेले काम कौतुकास्पद आहे.

जतच्या डॉ.आरळी यांच्या उमा चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने पूरग्रस्तांना प्रत्यक्ष हातात मदत पुरविली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.