राष्ट्रीय पक्षातून उमेदवारी मिळणार : लवकरचं मेळावा घेऊन घोषणा
जत,प्रतिनिधी : विधानसभेचे मैदान जवळ येत आहे.तशी नवीन समिकरणे समोर येत आहेत.आता नव्याने तालुक्यातील राजकीय पटलावरील चाणक्य नेत्याकडून नव्या समिकरणाची फोडणी दिल्याचे वृत्त असून या दोन चाणक्यासह अनेक पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांची एक गुप्त बैठक झाली असून चाणक्यापैंकी एका नेत्याला एका राष्ट्रीय पक्षातून विधानसभेच्या मैदानात उतरवयाची तयारी झाली असून त्या राष्ट्रीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी हिंरवा कंदील दाखविल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. लवकरचं नव्या उमेदवारांची मोठा मेळावा घेऊन घोषणा होणार आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा राजकारण गरम झाले आहे.
जत विधानसभेसाठी तालुक्यातील विद्यमान आ. विलासराव जगताप,डॉ.रविंद्र आरळी,विक्रम सांवत,सुरेश शिंदे,तम्माणगोंडा रवीपाटील यांनी निवडणूक लढविण्याचे यापुर्वी जाहीर केले आहे. त्यांनी तयारी सुरू केली आहे.त्यात वंचित आघाडीही काही उमेदवाराची चाचपणी करत आहेत.भाजपमधून आमदारांविरोधात बंड करून नव्या चेहऱ्यांला संधी द्यावी म्हणून तयारी सुरू आहे.
मात्र आता तालुक्यात एक नवे समीकरण जमले आहे.तालुक्यातील दोन वेगवेगळ्या पक्षातील दोन चाणक्य नेते म्हणून परिचित नेत्यांनी तालुक्यात वेगळा उमेदवार मैदानात उतरविण्याची तयारी केली आहे.उमेदवारही तगडा असून निवडणूक जिंकायची या इराद्याने सर्व तयारी पुर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याशिवास एका राष्ट्रीय पक्षातून या नेत्याला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.दोन्ही चाणक्य नेत्याच्या या खेळीने कुणाला दणका बसणार यांचीही जोरदार चर्चा सुरू आहे. जतेत लवकरचं समर्थक प्रमुख नेत्याची बैठकीत त्या नेत्यांची कोणत्या पक्षातून उमेदवारी यांची घोषणा होणार आहे.