डफळापूर : येथे गुरूवार बाजारात 45 हाजाराची चोरी प्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला.याप्रकरणी नागरिकांनी पकडलेल्या मिथून नंदू भोसले वय 29,रा.तादोळ,ता.पैठणी,जि.औरंगा
अन्य एका अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, डफळापूर येथील गुरूवार बाजारात शोभा नेताजी वाघमोडे रा.कुडणूर या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतून काढलेले 45 हाजार रूपये बँगेत घालून सांगली रोडच्या रस्त्याकडे चालल्या असताना दोघांनी त्याची पिशवी हिसका देऊन पळविली होती.त्यानंतर आठवडा बाजारात हे चोरटे एका नागरिकांच्या खिशातून पैसे काढताना त्याला पकडत पोलीसाच्या ताब्यात दिले होते.दरम्यान चोरी झालेल्या शोभा वाघमोडे यांनी नागरिकांनी पकडलेल्या संशयिताने पैसे पळविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास सा.पो.नि.कत्ते करत आहेत.