गुगवाड,वार्ताहर : उच्च शिक्षण तालुक्यातील अशिक्षित परिस्थिती बदलेल.पैशापेक्षा ज्ञानाला या जगात किंमत आहे. त्यासाठी तालुक्यात उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करू,असे प्रतिपादन आ.विलासराव जगताप यांनी केले.बिळूर ता.जत येथील बिळूर इग्लिंश स्कूल अँण्ड ज्यूनिअर कॉलेजच्या 11वी वर्गाच्या उद्घाटन प्रंसगी बोलत होते.बिळूर मठाचे.मुरगेद्र स्वामीजी यांचे हस्ते शाळेचे उद्घाटन झाले.यावेळी आ.जगताप,भाजपा नेते डॉ.रविंद्र आरळी,शिक्षण सभापती तम्माणगोंडा रवीपाटील,सुशीला तावशी,सुनिल पवार,संरपच बसवराज पाटील,चंद्रकांत गुडोड्डगी,शिवाप्पा तावशी आदी मान्यवर उपस्थित होते.
आ.म्हणाले,महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षण घेता आले.त्यामुळे आज उच्च पदावर काम करताना दिसत आहेत.
गावागावात माध्यमिक, उच्चमाध्यमिक शाळा सुरु होणे गरजेचे आहे. मुलासह मुलीही उच्चशिक्षित झाल्या पाहिजेत.तालुक्यातील शिक्षण संस्थांनी याकामी पुढाकार घ्यावा.
डॉ.आरळी म्हणाले,सध्या मुलाबरोबर मुली शिकणे गरजेचे आहे. एक मुलगी शिकणे म्हणजे कुंटूब शिकते.त्यामुळे मुलींच्या शिक्षणाला महत्व द्यायला पाहिजे.आता काळ बदलतोय त्यामुळे बिळूरसारख्या ग्रामीण भागातील मुली उच़्चशिक्षित होऊन पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षण व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे.
बिळूर ता.जत येथील कार्यक्रमात बोलताना आ.विलासराव जगताप