जत | दुचाकी चोरट्याला अटक अन्य एकटा फरारी | 6 दुचाकी जप्त | आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत |

0

Rate Card

जतेत दुचाकी चोरट्याला अटक

अन्य एकटा फरारी : 6 दुचाकी जप्त ; आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत

जत,प्रतिनिधी : जत शहरासह तालुक्यातील दुचाकी चोरीतील एका चोरट्याला जत पोलीसांनी पकडले.तर एकटा फरार झाला आहे.याप्रकरणी जत शहरातील विठ्ठलनगर येथील किरण मानसिंग कांबळे (वय 24) याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे तर अजय महेंद्र कांबळे हा फरार झाला आहे.दुचाकी चोरटा किरण कांबळे या न्यायालयात उभे केले असा न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या चोरट्याकडून आंतरराष्ट्रीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा शोध लागण्याची शक्यता आहे.चोरट्याकडून जत,राजवाडा चौक कोल्हापूर,शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेल्या 6 मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

अधिक माहिती अशी सुधाकर रामचंद्र सावंत,(रा.मोरे कॉलनी,जत) यांची दुचाकी मोटार सायकल नं. एमएच 45 वी 9467 ही घरा समोर लावलेली असताना अज्ञात आरोपीने ती चोरून नेल्याचा गुन्हा जत पोलीसात दाखल झाला होता. जत पोलीस भाग 5 गु.र.नं. 258/2019 भा. दं.वि.सं.कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना परिसरातील सीसीटिव्हीची पाहणी केली.त्यात संशयित आरोपी कांबळे आढळून आला होता.त्यानुसार किरण कांबळे याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांचा तो व साथीदार अजय कांबळे यांनी जत,कोल्हापूर,शिरोळ येथून चोरलेल्या 6 दुचाकी सापडल्या.त्या आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या.दरम्यान अजय कांबळे हा फरारी झाला आहे. दोघाविरोधात जत,शिरोळ,राजवाडा चौक कोल्हापुर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे दुचाकी चोरट्यांची आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे.फरार आरोपीचा शोध सुरू आहे.पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा,अप्पर अधिक्षक शशिंकात बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे,पोलीस निरीक्षक

शिवाजी गायकवाड,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर.एस. गुंडरे,पोलीस नाईक सदाशिव कणसे,पोलीस नाईक उमर फकीर, पोलीस नाईक प्रविण

पाटील, पो.कॉ.केरबा चव्हाण,पो.कॉ.संतोष खांडेकर यांच्या पथकाने कारवाई केली.अधिक तपास सदाशिव कणसे करत आहेत.

जत येथे पकडलेल्या दुचाकी चोरट्यासह पोलीस पथक

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.