जत : आवंढी (ता. जत) येथील समाधान दत्तात्रय बाबर (वय 35)यांच्या घरात घुसून, मला जेवण का देत नाहीस, असा जाब विचारुन त्यांचा भाऊ सचिन दत्तात्रय बाबर(30) याने त्यांच्या घरातील टीव्ही,फ्रीज, वॉशिंग मशीन आणि इतर काचेचे सामान दगड व काठीने फोडून सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली.याप्रकरणी समाधान बाबर यांनी सचिन बाबर याच्याविरोधात शुक्रवारी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास सुरू आहे.
विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा
जत : पाच्छापूर (ता.जत) येथील पतीपासून विभक्त एकट्याच राहत असलेल्या पन्नास वर्षीय विवाहित
महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून ज्ञानेश्वर अण्णाप्पा कांबळे (वय 35) याच्याविरोधात
पीडित महिलेने शुक्रवारी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.ही घटना गुरुवारी रात्री एकच्या दरम्यान घडली. पीडित महिला एकटीच घरात असल्याचे पाहून व तिच्या घरावर पाळत ठेवून संशयित ज्ञानेश्वर कांबळे याने तिच्या घरी जाऊन तिच्या विनयभंगाचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिथून पलायन केले. यासंदर्भात शुक्रवारी जत पोलिसात कांबळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.