जत | खड्ड्याभोवती रांगोळी काढून बांधकाम मंञ्याचे स्वागत करणार ; विक्रम ढोणे |
खड्डेमुक्तीच्या दावा जतेत फेलचा निषेध
जत,प्रतिनिधी : राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील आज जतमध्ये विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने येत आहेत.त्यांनी केलेल्या खड्डे मुक्तीची घोषणा हवेत विरल्याच्या निर्षेधार्थ जत शहरातील खड्डेयुक्त रस्त्यावर खड्ड्याभोवती रांगोळी घालून गांधीगिरी मार्गाने त्यांचे स्वागत करणार आहोत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी दिली.त्यांनी तसे तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्र घोषणा केली होती.घोषणा करून सहा महिने झाले तरी जत शहर खड्डेमुक्त होण्याऐवजी खड्डेयुक्त झाले आहे. यामुळे नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. यांच्या निषेधार्थ गांधीगिरी मार्गाने खड्ड्याभोवती रांगोळी घालून स्वागत आंदोलन करणार आहोत.कारण या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी,प्रशासन दुर्लक्ष करत आहेत.
या खड्ड्यांमुळे जत तालुक्यातील नागरिकांना कायमचे पाठिचे मणक्याचे आजार जडले आहेत.खड्यामुळे अनेक मोठे अपघात होऊन मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत.प्रशासन कोणाचा बळी जाण्याचे वाट पाहत आहे,असा प्रश्न उपस्थित होत आहे.म्हणून जतच्या मुर्दाड प्रशासनाला जाग यावी व याकडे लक्ष वेधावे यासाठी हे आंदोलन करणार असल्याचे ढोणे यांनी सांगितले.खड्ड्याचे दणके सहन करणाऱ्या नागरिकांनी सात सहभागी व्हावे असे आवाहनही ढोणे यांनी केले आहे.
किमान भाजपा कार्यालयासमोरील खड्डेतरी मुजवाजत तालुक्यात रस्त्यावरील खड्ड्याची सर्व सिमा ओलांडल्या आहेत.अगदी महाराष्ट्रभर खड्डेमुक्तची भिमगर्जना करणाऱ्या भाजपा सरकारच्या जत कार्यालयासमोरही गेल्या वर्षाषासून मोठे खड्डे पडला आहे.किमान ते खड्डेतरी बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मुजवावेत अशी टिकाही ढोणे यांनी केली.