भेसळीने दुधाला विष बनविण्याचे रँकेट
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात भेसळीने दुधाला विष बनविण्याचे धंदे खुलेआम चालू असताना भेसळीच्या कारवाईतही भेसळ करण्यात येत असल्याची चर्चा आहे. तालुक्यात एका अधिकाऱ्यांने कारवाईच्या निमित्ताने लाखोचा गल्ला जमविण्याचा उद्योग राजरोसपणे चालू केल्याचे समोर येत आहे.अन्नभेसळ विभागाच्या एक अधिकारी एका साहय्यकासह तालुक्यात कारवाई करत आहे.मात्र प्रत्येक कारवाईत मोठ्या आर्थिक लाभातून तडजोड होत आहे. त्यामुळे तालुकाभरात पांढऱ्या दुधातील बोके व एक अधिकारी सुसाट असल्याची चर्चा सुरू आहे. भेसळबाजीने सध्या दुधाला सफेद विषाच्या पंक्तीत नेवून बसविलेले आहे.अशा भेसळीची व्याप्ती जत तालुक्यातील ग्रामीण भागातही फोफावली आहे.अन्नभेसळ विभागाचे पथके चोर सोडून सन्याशाला फाशी देण़्याचा प्रकार करत आहेत. जत तालुक्याच्या नेमणूकीचे अधिकारी कारवाई करताना एकटेच खाजगी वाहऩ घेऊन फिरत आहेत.कारवाईचा धाक दाखवून आर्थिक फायद्यासाठी अशा प्रकाराला पाठिशी घालत आहेत.
अनेक ठिकाणी बोगस दुध तयार करण्याची यंत्रणा सुरू असल्याची चर्चा आहे.भेसळीच्या या दुधातून लोकांच्या शरीरात वेगवेगळी रसायने, डीटर्जंट पावडर, शँपू, सिंथेटीक पदार्थ,तेल,पावडर असे बरेच काही जावून लोकांच्या आरोग्याला जीवघेणा धोका निर्माण झालेला आहे.राज्यात खासगी आणि सहकारी क्षेत्रातील लहान मोठे शेकडो दूध संघ आहेत.यापैंकी काही सन्माननीय दूध संघांचा अपवाद वगळला तर बहुतेक सगळ्या दूध संघांमध्ये दुधातील स्निग्धांश काढून घेवून त्यात अन्य घटक मिसळण्याचे उद्योग चालतात. कदाचित लोकांचा विश्वास बसणार नाही, पण मिसळल्या जाणार्या घटकांमध्ये युरियासारखी रासायनिक खते, डिटर्जंट पावडर, कच्च्या स्वरूपातील डालडा, मैदा,साखर,तेल अशा पदार्थांचा समावेश आहे.
युरियासारख्या रासायनिक खताला ओला हात लावला तर काही वेळातच हाताला बारीक बारीक फोड येवून त्या भागाला खाज सुटते. मग हे रासायनिक खत दुधातून पोटात गेल्यानंतर आतड्यांची काय वाट लागत असेल त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही. लहान मुलांना मातेच्या दुधा व्यतिरिक्त पुरक अन्न म्हणून बाहेरचे दूधच दिले जाते. आता हे असले युरियामिश्रित दूध पिवून बालकांच्या आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याचे कसे धिंडवडे निघत आहेत.
अन्नभेसळाच्या एका अधिकाऱ्यांच्या कारवाईचे गौडबंगालगेल्या महिन्यासाठी जत तालुक्यातील एका गावात अन्नभेसळच्या एका अधिकाऱ्यांनी खाजगी दुचाकीवरून येऊन थेट भेसळच्या ठिकाणी छापा टाकला.मोठ्या मुद्देमाल,साहित्य हाताशी लागले,मात्र आर्थिक तडजोड होत हे प्रकरण मिटल्याची चर्चा आहे.तालुक्यातील जबाबदारी असणारे अन्नभेसळचा एक अधिकारी आलिशान गाडीतून कारवाईसाठी एका सहाय्यकां सोबत फिरत आहे.प्रत्येक ठिकाणी छापा टाकला कि तडजोडीनी प्रकरण मिटविण्यात येत असल्याची दुग्ध व्यवसायिकात चर्चा आहे. त्यामुळे तालुक्यात जमा होणाऱ्या सत्तर टक्के दुधात भेसळ होत असताना कारवाई केल्याचे समोर येत नाही हे विशेष
उद्याच्या अंकात वाचा :भेसळीत वापरणाऱ्या स्टार्च पावडरची जत तालुक्यात ट्रकने विक्री