जत | भेसळीच्या स्टार्च पावडरचा तालुकाभर ट्रकने पुरवठा | FDI अधिकाऱ्यांच्या संगनमताने नवा फंडा

0

Rate Card

70 टक्के दुधात भेसळ

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात दुध भेसळीने उच्चांद मांडला आहे.दररोज संकलन होणाऱ्या 70 टक्के दुधात कपडे इस्ञी करावयाची स्टार्च पावडर,तेल,कपड्यासाठी वापरायची नीळ,युरिया,मीठ अशी घातक पदार्थ मिक्स करून दुधाचे फँट वाढविण्याचा नवीन फंडा तालुक्यात सुरू आहे. तालुक्याभरात स्टार्च पावडर ट्रकने येत असल्याची खळबंळजनक माहिती समोर येत आहे. दुधाला विष बनविण्यात अन्नभेसळ विभागही भागीदार आहे.जत तालुक्यात अन्नभेसळचा एक निरिक्षकांचे संघ चालक,डेअरी मालक व सर्वात भयानक म्हणजे स्टार्च पावडर वितरण करणाऱ्या एंजन्टा सोबत उठबस  असल्याची चर्चा आहे.त्यामुळे जतच्या दुधात भेसळीतून कोट्यावधीचा धंदा उदयास आला आहे.

तालुक्यात दुष्काळात दुधासारख्या पवित्र पदार्थात कपड्याची स्टार्च पावडर वापरून फँट वाढविण्याचा नवीन फंडा दुध संघ,दुध डेअऱ्या,संकलन केंद्रावर राजरोसपणे सुरू आहे.

स्टार्च पावडर, पाणी,सुर्यफूल तेलाचे मिक्सरवर मिश्रण करून त्यापासून थेट बनावट दुध तयार करून इतर दुधात मिसळले जाते.त्यामुळे दुधाची फँट जादा लागते.व दर जादा मिळत आहे.याचा परिणाम तालुक्यातील दुध उत्पादन दुप्पटीने वाढले आहे.तालुकाभरात होणार दुधसंकलन व जनावरांची संख्या यांचा विचार करता दररोज एकादी गाय पन्नास लिटर दुध देते की काय अशा हिशोबाने दुध संकलन होत आहे. 

जत तालुक्यात पेंड विक्रेत्यापासून दुध संघापर्यत सर्वाचा यात सहभाग आहे.त्यामुळे तालुक्यातील 70 टक्के दुध विष होऊन पुढे जात आहे.

सर्वच पदार्थात भेसळीचा कहर,एफडीआयच्या अधिकाऱ्यांना मोठा लाभ

जत तालुक्यात सर्वच जीवनावश्यक वस्तूत राजरोसपणे भेसळ होत आहे. किराणा,हॉटेल,व छोटे मोठे व्यापारी यांच्याकडून सांगलीच्या अन्नभेसळच्या अधिकाऱ्यांना दिवाळीला मोठी रक्कम पोहचती केली जाते.त्यामुळे कुठेच कारवाई होत नाही.प्रत्येकवेळी कर्मचाऱ्यांची कमतरता म्हणून वेळमारून नेहली जात आहे. तालुका भरात बंदी असलेला गुटखा,तंबाकूजन्य पदार्थ उघड्यावर विकले जात आहेत.काही अपवाद वगळता अनेक हॉटेल,वडापाव,चायनीय स्टॉलवरून दर्जाहीन पदार्थ विकले जात आहे.त्याशिवाय किराणा,फळे,केळी विक्रेत्यांनी कहर केला असून त्यांना वाटेल तसे भेसळीचे जादा उत्पादन मिळणारे पदार्थ विकले जात आहे.परराज्यातील बेकरीतून विकलेले जाणारे खव्याचे पदार्थ कोणतीच गुणवत्ता पाळत नाहीत.यांच्यावर वर्षभरात बोटावर मोजण्याएवढ्या कारवाया झाल्या आहेत.

अन्नभेसळच्या एका अधिकाऱ्याचा एक पेंड विक्रेता एंजट 

जत तालुक्यासाठी नेमलेला अन्नभेसळच्या एका अधिकाऱ्यांने थेट कारवाईचा धाक दाखवत लुटमार सुरू केली आहे. जत शहरातील एक पेंड विक्रेता या अधिकाऱ्यांचा एंजन्ट आहे.दुध भेसळीच्या कारवाईवर त्यांचे लक्ष आहे.दर आठ दिवसाला आलिशान खाजगी गाडीतून एकटाच येत हा अधिकारी कारवाया करत फिरत आहे.पश्चिम भागातील भेसळीत एक नंबर असलेल्या एका दुध संघाचा मालक कारवाई झालेल्या दुध डेअरी चालकांशी मोठी रक्कम ठरवून प्रकरण मिटवत असल्याची चर्चा आहे. ठरलेली रक्कम शहरातील पेंड दुकानात जमा करून ती त्या अधिकाऱ्यापर्यत पोहचवली जात आहे. भेसळचे साहित्य विकणारे,भेसळखोराचे या अधिकाऱ्यांशी साटेलोटे आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.