जत,प्रतिनिधी : जत पुर्व भागातील 62 गावांना म्हैसाळ योजनेच्या मायथळ कालव्यापासून गुड्डापूर तलाव व पुढे पुर्व भागातील गावांना पाणी द्यावे या मागणीसाठी हभप तुकाराम महाराज यांच्या संख ते मुंबई पायी दिंडी आंदोलनाचे पहिले पर्व फत्ते झाले.गुरूवारी मुंबईत पोहचलेल्या पायीदिंडीतील आंदोलकांशी जलसंपदा मंञ्यांनी मंत्रालयात बोलवून घेत मागण्याचे निवेदन स्विकारत त्यांच्या सदनात बैठक घेत आंदोलकाच्या मागण्या जाणून घेतल्या.मात्र ठोस निर्णय दिल्याशिवाय आजाद मैदान येथे सुरू असलेले उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.त्यामुळे सायकांळी जलसंपदा सचिव यांच्या समवेत दुसरी बैठक घेत तातडीने मायथळ कालव्यातून पुढचे सर्व्हेशन आठ दिवसात करून अहवाल सादर करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.अहवालानंतर तिसरी बैठक घेत यांच्या सर्व बाजू जाणून घेत तातडीने पाणी देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.त्यामुळे तुकाराम महाराज यांनी हे आंदोलन तात्पुर्ते आंदोलन मागे घेतले.मात्र आठ दिवसात ठोस निर्णय न झाल्यास या भागातील शेतकऱ्यासह म्हैसाळच्या कँनॉलमध्ये आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी तुकाराम महाराज यांनी दिला आहे.
दरम्यान तेरा दिवस सुमारे सहाशे किलोमीटर चालत 18 आंदोलक शेतकरी पायी चालत मुंबई पोहचले होते.यात शेतकऱ्यांच्या दोन मुलाचा समावेश होता.त्यामुळे या भागातील परिस्थिती शासनापुढे मांडता आली.हभप तुकाराम महाराज यांनी पुर्व भागातील 62 गावच्या पाण्यासाठी उभारलेले आंदोलन यात सहभागी न झालेल्या बोलबच्चन शेतकऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशावरून सांगलीच्या जलसंपदा विभागाकडून या भागातील सर्व्हेशन होणार आहे. त्यांनतर कँनॉलचे काम कसे सुरू करता येईल या संदर्भात मंत्री महाजन हे बैठक घेणार आहेत.
8 दिवसात निर्णय न झाल्यास आमरण उपोषणजत पुर्व भागातील परिसराचा कायपालट करायचा यासाठी काम करणारे हभप तुकाराम महाराज यांनी या भागात सिंचन योजनेतून पाणी आणण्यासाठी लढा उभारला आहे.त्याचाच भाग म्हणून त्यांनी संख-मुंबई पायीदिंडी काढली.त्याची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेत सकात्मक चर्चा केली. त्याशिवाय तातडीने सर्वेक्षणाचे आदेश दिल्याने हे आंदोलन तापुर्ते माघार घेतले आहे. मात्र आठ दिवसात यांचा निर्णय न झाल्यास म्हैसाळच्या कँनॉलमध्ये उपोषण करू.– हभप तुकाराम महाराज
पायी दिंडीत सहभागी शेतकरीदिंडीचे संयोजन हभप तुकाराम महाराज,कामाण्णा मारुती बंडगर (माडग्याळ),गुरबसु अशोक भावीकट्टी (बिळूर),लिंबाजी मारुती माळी (माडग्याळ),मल्लिकार्जुन शिवपुत्राप्पा बिराजदार (गुड्डापुर),बसाप्पा गुरुशिध्दा माळी (माडग्याळ),दसरथ महादेव सुतार (माडग्याळ),विक्रम ढोणे(जत) धानाप्पा यल्लाप्पा राठोळ (गोंधळेवाडी),पांडूरंग काशिनाथ शिंदे (चिक्कलगी),बाळु मारुती डोंबाळे (मोटेवाडी),बसवराज चन्नाप्पा बिराजदार (मारोळी),रामचंद्र सिद्राया रवि (मारोळी),रामलिंग मदाप्पा मेडीदार (मारोळी),शिवम अमित भिसे (संख),सानवी शंकर शिंदे (संख),रमेश विठ्ठल कुंभार (चिक्कलगी),जेटलिंग दुंडाप्पा कोरे (माडग्याळ),चेतन धानाप्पा राठोळ (गोधंळेवाडी),लक्ष्मण जकगोडं(बिंळूर)
जत-संख पायीदिंडीतील हभप तुकाराम महाराज व शेतकऱ्यांशी जल संपदामंत्री गिरिष महाजन यांनी चर्चा केली.तत्पुर्वी आजाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले.