जत | रौप्य महोत्सवी गणेश व्यापारी पतसंस्था,जत | उद्यापासून स्व:वास्तूत,कार्यरंभ |

0

Rate Card

रौप्य महोत्सवी गणेश व्यापारी पतसंस्था,जत

 आजपासून स्व:वास्तूत,कार्यरंभ

गेल्या 25 वर्षांपूर्वी जत शहरातील व्यापारी मित्रांनी एकत्रीत येवून शहरातील

छोटे मोठे उद्योजक,किराणा व्यापारी,वाहनधारक, शेतकरी छोटे भाजी विक्रेते यांच्या आर्थिक

उन्नतीसाठी व्यापारी बांधवांची पतसंस्था असावी या विचाराने “गणेश व्यापारी पतसंस्थेची दि.11/04/1994 रोजी “गुडीपाडव्याच्या शुभमुर्हुतावर स्थापना केली.त्याला आज पंचवीस वर्षे पुर्ण होत आहेत.रौप्यमहोत्सवी या वर्षात संस्थेच्या स्व:ताच्या भव्य इमारतीत कार्यालय सभासदाच्या सेवेत दाखल होत आहे.विविध मान्यवरांच्या हस्ते या इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न आज होत आहे.

शहरातील या पतसंस्थेच्या माध्यमातून

अनेक गरजू व्यापारी शेतकरी, भाजीविक्रेत्यांना वाहन खरेदी,सोनेतारण कर्जासह,इतर व्यवसाय वाढीसाठी आर्थिक अडचणी भागवणेसाठी कर्जाच्या रुपाने आर्थिक हातभार लावत,आर्थिक जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.आज पतसंस्थेला विधायक अर्थसेवेची 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.संस्थेने गेल्या 25 वर्षात पारदर्शी,स्वच्छ कारभार करून नावलौकिक मिळविला आहे.सामाजिक हित जपताना संस्थेच्यावतीने अनंत अडचणींचा सामना करत हे यश मिळविले आहे.आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करत संस्थेने आपल्या सभासदांना,ठेवीदारांना व कर्जदारांना आर्थिक मदत करुन त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.एखाद्या संस्थेच्या वाटचालीतील विशिष्ट वयाचा कालावधी हा त्या संस्था संचलनातील पदाधिकारी,सहभागी घटकांच्या ध्येय धोरणांचा दृष्टीकोनाचा,वृत्ती-कृती कार्य, तत्त्वप्रणालीचा,बांधिलकी,आणि समाज विश्वासाचा भाग ठरत असतो.त्यादृष्टीने

गणेश व्यापारी पतसंस्थेने सभासद-ग्राहकांच्या भक्कम विश्वासाचा पाया,सेवक वर्गाच्या श्रम-समय,सेवेच्या भिंती,संचालकांच्या विचारधारेचा गाभारा असल्यानेच या आपल्या पतसंस्थेला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवरही अर्थव्यवस्थेतील नवनवीन

संकल्पना,पतसंस्था नियमांचे व नियमांचे काटेकोर पालन करीत ती अधिकाधिक सर्वव्यापी बनली आहे.स्वनिधी, गुंतवणूक,सी.डी.रेपो आणि पतसंस्थेला मानबिंदू ठरणाऱ्या 0%एनपीए, सुरक्षित-संरक्षित गुंतवणूक अशा अर्थसंस्थेला , सहकाराला अभिप्रेत, अपेक्षित आवश्यक नियमांचे तंतोतंत पालन हेच संस्थेचे वैशिष्ट्य ठरले आहे.केवळ अर्थकारण हेच मर्यादित ध्येय न ठेवता,समाजाजहिताला प्रथम पासून प्रधान्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे.संस्थेच्या वतीने तालुक्यातील वेगवेगळ्या बंधारे,तलावातून गाळ काढणे,तसेच सभासदांच्या पाल्यांना

गुणवत्तेनुसार प्रोत्साहनपर बक्षिसे, जनावरांच्या चाऱ्यासाठी मदत,दुष्काळग्रस्त निधी,मुख्यमंत्री सहाय्यता निधी,पुरग्रस्तांना मदत,विविध ठिकाणी वृक्षारोपण, इत्यादी सामाजिक कार्यात योगदान दिले आहे.

आजपर्यंत केलेली आहेत.या विश्वासावर संस्था आज जागतिकीकरणाच्या विश्वात स्वत:ची आर्थिक बाजू भक्कम करून, प्रथमच तालुक्यातील नामाकिंत संस्था म्हणून उदयास आली आहे.संस्थेची स्वत:ची हक्काची इमारत असावी म्हणून, जागा घेवून त्यावर भव्यदिव्य इमारत उभी केलेली आहे. याच इमारतीत आज हा “रौप्यवर्ष पुर्ती”सोहळा संपन्न होत आहे.यापुढे संस्थेचा चढता आलेख असाच राहिल,त्याशिवाय नवनविन अत्याधुनिक सेला-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न राहिल.ठेवीदारांच्या सुरक्षितेची संस्थेने काळजी घेतलेली आहे.

पतसंस्थेची 31/03/2019 अखेरची सांपत्तिक स्थिती• वसूल भागभांडवल – 67,88,600/-• स्व:निधी रूपये – 2,67,42794/-• ठेवी रुपये – 6,40,17349/-• गुंतवणूक रूपये- 3,88,55172/-• नफा रूपये – 41,18,811/-• कर्जे – 7,30,78658/-खेळते भांडवल – 12,31,43938/-(सर्व आकडे कोटीत आहेत)

शंब्दाकन : सुनिल जेऊर

सचिव,गणेश व्यापारी पतसंस्था,जत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.