डफळापूर : डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कृतव्यदक्ष अधिकारी डॉ
अभिजीत चौथे यांची कोणतीही चूक नाही. स्टँडमधील महिलेची प्रस्तूती महिलेच्या पतीच्या हलगर्जीपणामुळे झाली आहे.डॉ.चौथे यांनी महिलेवर तातडीने उपचार केल्याने महिला व तिची दोन्ही जुळे सदृढ व ठणठणीत आहेत.केंद्राचे अधिकारी डॉ.चौथे हे गेल्या आठ वर्षापासून एकटे असतानाही 24 तास
डॉ.चौथे कर्तव्यदक्ष अधिकारी, अन्यायकारक कारवाई करू नका अशा मागणीचे डफळापूर ग्रामपंचायत व डफाळापूर ग्रामस्थाच्या वतीने दोन स्वतंत्र निवेदने जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांना देण्यात आली.
डफळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने परशुराम चव्हाण सर,माधव पाटील,तानाजी चव्हाण, सदाशिव शांत यांनी निवेदन दिले.ग्रामस्थाच्या वतीने बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, बाळासाहेब चव्हाण यांनी अशी दोन स्वतंत्र निवेदने देण्यात आली.