डफळापूर | गायकवाड बसथांब्यावरच महिलेची प्रसुती | महिलेची हेळसाड | जबाबदारी कोणाची |

0


जुळ्यांना जन्म : सेवानिवृत्त परिचारिका व महिलांची मदत ; रुग्णवाहिका नसल्याने हेळसांड

बाळ,बाळतींनीसह डॉ.चौथे व नर्स

Rate Card


डफळापूर,वार्ताहर : बसाप्पावाडी.
ता.कवटेमहांळ येथील कल्पना अनिल लोंखडे या महिलेची गायकवाड बसस्थानकात प्रस्तूती झाली.सुदैवाने डफळापूर आरोग्य केंद्राच्या सेवानिवृत्त नर्स,कर्मचारी व महिलांनी प्रसंगावधानामुळे दोन्ही बाळ व बाळंतीन सुखरुप आहेत.
अधिक माहिती अशी, बसाप्पावाडी येथील एका गरोदर महिलेला पोटात दुखत असल्याने तिच्या पतीने डफळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणले होती.गुरूवार असल्याने केंद्रात रुग्णांची प्रचंड गर्दी असल्याने बराच वेळ त्या महिलेचा नंबर आला नाही.मात्र एका महिला कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच तिने तातडीने वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चौथे तिला यांच्या केबिंनमध्ये महिलेला नेहले.डॉ.चौथे यांनी तिची तपासणी केली. त्यात प्रस्तूती होईल अशी लक्षणे दिसत नव्हती.त्याशिवाय तिच्याकडेच्या कागदपत्रानुसार 8 महिने संपून 9 महिना लागल्याचे लक्षात आले.तर सोनोग्रॉपी रिपोर्ट नुसार तिच्या पोटात दोन अर्भके असल्याचे डॉ.चौथे यांच्या निदर्शनास आले.त्यांनी क्रिटिकल परिस्थिती बघून तिला मिरज सिव्हिल रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.त्याशिवाय केंद्राची रुग्णवाहिका बंद असल्याने जतहून 108 रूग्णवाहिकेला बोलविण्यात आले.महिला व तिच्या पतीला थोडावेळ थांबण्यास सांगण्यात आले. मात्र गर्दीतून महिला व पती सुमारे अर्धा किलोमीटर चालत सांगली रोडवरील गायकवाड बसस्टॉपजवळ आले.महिलेला तेथे प्रस्तूत कळा येऊ लागल्या.तिच्या ओरडण्याने जवळच्या काही महिला गोळा झाल्या.त्यांनी स्टँडजवळ राहणाऱ्या सेवानिवृत्त नर्स सौ.वत्सला जाधव यांना यांची माहिती दिली.त्यांनी महिलेची परिस्थिती पाहून प्राथमिक आरोग्य केंद्रात कळविले.तातडीने त्यांचे कर्मचारी

मीना कोळी,जया कोळी,सौ.मोटे,काळे

तेथे पोहचले.मात्र तोपर्यत प्रस्तूती झाली.सौ.जाधव व कर्मचाऱ्यांनी महिलेची पस्तूती केली.
त्यांच्या प्रंसगावधाने दोन्ही बाळ व बाळंतीन सुखरूप आहेत.विशेष म्हणजे दोन्ही मुलगे जन्मले आहेत.बराच वेळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने तिला एका खाजगी टेम्पोतून प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

रुग्णवाहिका बिनकामाचीडफळापूर आरोग्य केंद्रात एक रुग्णवाहिका आहे.मात्र ती सध्या बंद स्थितीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.तर जतच्या 108 रूग्णवाहिकेला कळवूनही तब्बल 4 तास रुग्णवाहिका पोहचली नाही.त्यामुळे नेमका रुग्णाचा मुत्यू झाल्यावर रुग्णवाहिका पोहचणार होती काय?,असा संप्तत सवाल उपस्थित नागरिकातून विचारला जात होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.