जत,प्रतिनिधी : जत शहरातील अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने शरीर संबध ठेवल्याप्रकरणी सचिन चंद्रकात विठेकर वय-22,रा.विठ्ठलनगर जत यांच्या विरोधात बाल लैगिंक अत्याचार (पोस्को)अंतर्गत गुन्हा दाखल झाला.पिडित मुलीने या प्रकरणी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी, जत शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत संशयित सचिन विठेकर यांने 5 जून रोजू तिला सांगली येथे नेहत जबरदस्तीने शरिर संबध ठेवले.परत तिला जत येथे आणून सोडले होते.पिडित मुलीने घरी हा प्रकार सांगितल्याने त्यांनी पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली.अधिक तपास सा.पो.नि.अनिल माने करत आहेत.