डफळापूर | जत-सांगली रस्ता शेतकऱ्यांनी तासभर रोकला | मिरवाड तलावात पाणी सोडण्याची मागणी |

0

 आश्वासनानंतर आंदोलन मागे

डफळापूर, वार्ताहर : मिरवाड ता.जत येथील तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी डफळापूर -जत रोडवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तासभर शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला.गुरूवार बाजाराचा दिवस असतानाही मोठ्या संख्येने शेतकरी मोर्च्यात सहभागी झाले.रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाची मोठी गर्दी झाली होती. 

Rate Card

शेतकऱ्यांनी बैलगाड्या,मेंढरे रस्त्यावर उतरवली होती.

म्हैसाळ देवनाळ कालव्यातून पाणी सोडण्यात यावे या मागणीचा सहानभुतीपुर्वक विचार करण्यात येईल,त्यासंदर्भात आज वारणाली येथील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंदोलक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,कॉम्रेड हणमंत कोळी,बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

महेश खराडे म्हणाले,मिरवाड व त्या परिसरातील शेतकऱ्यांनी तीन महिन्यापुर्वी पाणीपट्टीचे पैसे भरूनही साडेतीन महिने पाणी मिळत नाही.तर खासदारांची हत्तीवरून मिरवणूक काढली म्हणून बिंळूर पाणी सोडले जाते,हा कुठला न्याय.बिंळूरला पाणी देण्यास आमचा विरोध नाही मात्र त्यांना पाणी  देण्यासाठी डफळापूरावर अन्याय करू नका.
डफळापूरला अगोदर पाणी द्या व नंतर बिंळूरला पाणी सोडावे.म्हैसाळच्या अधिकाऱ्यांचे नियोजन नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. अनेक अधिकारी दुजाभाव करत आहे. सर्वच शेतकरी आहेत.समान पाणीवाटप करावे.हे पहिले आंदोलन आहे.यापुढे आंदोलन करण्याची वेळ आणू नका अशीही सुचना खराडे यांनी म्हैसाळ योजनेच्या उपस्थित अधिकाऱ्यांना केली.

हणमंत कोळी म्हणाले,मुळात मिरवाड परिसरातील शेतकऱ्यांचे पाण्याअभावीचे हाल बघवत नाही.शेतीसह पिण्यासाठी आम्ही पाणी मागतोय.मिरवाडवर म्हैसाळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अन्याय केला आहे.प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा वादगस्त विषय आतापर्यत संपवायला पाहिजे होता.मात्र फक्त त्यांच्याकडे बोट करत वेळ मारून नेहली आहे.आता पिण्यासाठी सुद्धा त्या परिसरात पाणी नाही.त्यामुळे आम्ही देवनाळ कालव्यातून मिरवाड ओढापात्रातून तलावात पाणी सोडण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याने आजचे आंदोलन मागे घेतले आहे. मात्र पाणी येईपर्यत आमचा संघर्ष सुरू राहील.

दिग्विजय चव्हाण म्हणाले,
मिरवाड तलावासाठी सव्वापाच लाख रूपये शेतकऱ्यांनी भरले आहेत.त्याला साडेतीन महिने संपले आहेत.आता टंचाईतून पाणी सोडण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.ते सांगूनही दोन महिने झाले. आता आमचा संयम सुटला आहे.हे आंदोलन हलक्यावर घेऊ नका,यापुढे आमचा तीव्र संघर्ष बघावा लागेल.जोपर्यत मिरवाड तलावात पाणी सोडत नाही,तोपर्यत बिंळूरला पाणी जाऊ देणार नाही.त्यासाठी आम्हाला जेलमध्ये बसावे लागले,तरीही आम्ही मागे हटणार नाही.देवनाळ कालव्यामधून मिरवाड ओढापात्रातून पाणी सोडावे.अधिकाऱ्यांनी येत्या चार दिवसात नियोजन करावे.

अभिजित चव्हाण म्हणाले,म्हैसाळचे पाणी देताना नेहमी डफळापूरवर अन्याय केला जात आहे. प्रत्येक वेळी डफळापूरला पाणी सोडले की मागे कँनॉलची फोडाफोडी होते.त्यामुळे आम्हाला मागणी ऐवढे पाणी मिळत नाही.अधिकारी पुर्ण जबाबदारीने काम करत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.मिरवाड तलावात बिंळूर कालव्यातून पाणी सोडण्याचा विषय आता टाळावा,आम्हाला जोपर्यत तो कँनॉल पुर्ण होत नाही.तोपर्यत देवनाळ कालव्यातून पाणी सोडावे.आम्हाला यापुढे मागणीप्रमाणे पाणी आलेच पाहिजे.

देवनाळ कॉलव्याच्या अधिकाऱ्याचा नाचा फाडाच
देवनाळ कालव्यातून मिरवाड तलावात पाणी सोडणे हा एकच मार्ग सध्या उरला असल्याने शेतकऱ्यांनी मागणी लावून धरली.मात्र म्हैसाळच्या देवनाळ कालव्याचे वरिष्ठ अधिकारी श्री.मिरजकर यांचा पाणी सोडण्याचे अधिकार मला नाहीत, हा नाचा पाठा शेवटपर्यत कायम होता.त्यांनी अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी हणमंत गुणाले यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला.आंदोलकाशी त्यांचे बोलणे केले.मात्र त्यांच्या सुचनेवरून शेवटपर्यत मिरजकर यांनी मिरवाडला पाणी देऊ असे सांगितलेच नाही.त्यामुळे पुढेही मिरवाड पाणी सोडतील यांची शाश्वती नाही.यात म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा यावेळी स्पष्ट जाणवत होता.शेतकऱ्यांचा आक्रमकपणा कमी करण्याऐवजी ते भडकावेत अशीच भूमिका अधिकाऱ्यांकडून घेण्यात येत होती.पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्ती करत मार्ग काढत आंदोलन संपविले.

डफळापूर येथील रास्तारोकासाठी शेतकऱ्यां बैलगाड्या,मेंढरे रस्त्यावर आणली होती.मोर्चेकरांनी म्हैसाळ योजनेचे अधिकारी श्री.मिरजकर यांना घेराव घालत जाब विचारला.रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी आलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता देत माणूसकीचे दर्शन घडविले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.