विटा : विटा ता.खानापूर येथील शिवप्रताप नागरी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा या संस्थेला यावर्षीचा 51 ते शंभर कोटीच्या ठेवी या गटामध्ये “सर्वोत्कृष्ट संस्था” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.सहकारी संस्था क्षेत्रात संस्थेचे चेअरमन प्रतापराव साळुंखे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पारदर्शी कारभार करत संस्थेने राज्यात नावलौकिक मिळवला आहे.सहकार क्षेत्रात सर्वांना प्रेरणा ठरेल असा संस्थेचा कारभार सुरू आहे.काळानुरूप बदल, सर्वोत्तम गुणवत्ता व ग्राहकाभिमुख सेवा याला सर्वोत्तम महत्त्व देत संस्थेने अत्याधुनिक सेवा देत वेगळा ठसा उमटवला आहे.याचा दखल घेत फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड द्वारा दिला जाणारा हा पुरस्कार शिवप्रताप संस्थेला घोषित करण्यात आला अाहे. 7 जून 2019 रोजी साईबाबाच्या पुण्यभूमीत शिर्डी येथे भव्य “सहकार गौरव” पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे.पुरस्काराबद्दल संस्थेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.सहकारी संस्था क्षेत्रात संस्थेचे चेअरमन प्रतापराव साळुंखे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पारदर्शी कारभार करत संस्थेने राज्यात नावलौकिक मिळवला आहे.सहकार क्षेत्रात सर्वांना प्रेरणा ठरेल असा संस्थेचा कारभार सुरू आहे.काळानुरूप बदल, सर्वोत्तम गुणवत्ता व ग्राहकाभिमुख सेवा याला सर्वोत्तम महत्त्व देत संस्थेने अत्याधुनिक सेवा देत वेगळा ठसा उमटवला आहे.याचा दखल घेत फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड द्वारा दिला जाणारा हा पुरस्कार शिवप्रताप संस्थेला घोषित करण्यात आला अाहे. 7 जून 2019 रोजी साईबाबाच्या पुण्यभूमीत शिर्डी येथे भव्य “सहकार गौरव” पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे.पुरस्काराबद्दल संस्थेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.