डफळापूर : येथे बेसुमार सुरू असलेले अवैध धंदे तातडीने बंद करावेत अन्यथा जिल्हा पोलीस प्रमुख कडे तक्रार करू अशी माहिती सरपंच बालिकाकाकी चव्हाण यांनी दिली.
डफळापुर बेधडकपणे मटका,जुगार,बेकायदा दारू सिंदी यासारखे अवैध धंदे सुरू आहेत.यामुळे गावातील तरुण वर्ग बरबाद होत आहे.अगदी थेट उघड्यावर मटक्यासारखे अवैध धंदा सुरू आहे.हे सर्व काही पोलिसांना दिसत असून त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नाही.गावातील सर्व अवैध धंदे बंद व्हावेत,यासाठी ग्रामपंचायतीत तसा ठराव घेतला आहे.याबाबत जत पोलीसांना याबाबत कळविण्यात आले आहे. तरीही असे अवैध धंदे वरदान दिल्यासारखे चालू आहे.ते तातडीने बंद करावे,अन्यथा थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करू असेही शेवटी सरपंच चव्हाण यांनी सांगितले.