डफळापूर | मटक्या अड्ड्यावर अखेर विशेष पथकाचे छापे | तीघांना पकडले |

0

84 हाजाराचा मुद्देमाल जप्त : अन्य एंजन्ट रडारवर

Rate Card

डफळापूर : येथे जत पोलीसाच्या सहकार्याने बेधडपणे सुरू असलेल्या मटका चालकांच्या मुसक्या अखेर जिल्हा पोलीस प्रमुखाच्या विशेष पथकाने आवळल्या.डफळापूर स्टँड नजिक व बुवानंद दर्ग्यानजिक सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत 84 हाजाराचा मुद्देमाल जप्त केला.त्यात मटका एंजन्ट सचिन सुभाष छत्रे,वय- 37,याला बुवानंद दर्गा परिसरातून ताब्यात घेतले.त्यांच्याकडे 18 हाजार 985 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.तर स्टँडला लागून एका खोक्यात चिठ्ठी घेणारा विनोद मधूकर कांबळे,वय-35 यांला ताब्यात घेत 66 हाजार पंचवीस रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. मुख्य बुकी मालक सिकंदर जमादार रा.कुपवाड़ हा फरार झाला आहे.डफळापूर येथे अवैध धंदेचालकांनी गाव अशांत केले आहे.मटका थेट दर्गा,मुख्य चौक,स्टँड परिसरात उघड्यावर घेतला जात होता.त्याशिवाय तीन पानी पत्याचा क्लब अगदी स्टँडसमोरील एका इमारतीत परवाना मिळाल्यागत सुरू होता.त्याशिवाय बेकायदा दारू,सिंदी सारखे व्यवसाय बिनधास्त सुरू आहेत. जत पोलीसांना दिला जाणारा लाखवर हप्त्यामुळे या बेकायदा धंद्याना कवच असल्याची चर्चा आहे.

या अवैध धंद्यामुळे तरूण पिडी बरबाद झाली आहे.एक-दोन मटका एंजन्टाचे आता 10 वर एंजन्ट निर्माण झाले आहेत.तर खेळणाऱ्यांची संख्या शेकड्याने वाढली आहे.थेट सार्वजनिक ठिकाणी मटक्याचे चिठ्या लिहून घेतल्या जात आहेत.सर्वकाही सुरू असताना जत पोलीसाची चुप्पी याला बंळ देत होते.अखेर डफळापूराचा मटका,जुगाराच्या अड्ड्याची बातमी जिल्हापोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांच्या कानावर गेल्याने त्यांच्या पथकाने सोमवारी सायकांळी छापा टाकत चिठ्ठी लिहत असताना दोन मटका एंजन्टांना रंगेहाथ पकडले.छापा पडताच बाकीचे सात-आठ मटका एंजटांनी धूम ठोकली.मात्र यापुढे मटका सुरु राहिल्यास या एंजटांची खैर नसल्याचे पथकाचे प्रमुख कैलास कोडग यांनी सांगितले.

हद्दपारीचा प्रस्ताव दाखल होणार ?
डफळापूर येथे मटका एंजन्टावर अनेकवेळा कारवाया होऊनही मटका सुरु ठेवणाऱ्या काही मटका एंजन्टावर हद्दपारीचा प्रस्ताव दाखल होणार असल्याची पोलीस स्तरावर चर्चा सुरू आहे.

गेल्या सहा महिन्यात मटक्याचे डफळापूर मुख्य केंद्र बनले
ऐतिहासिक वारसा असलेले स्वांतत्रपुर्व काळात आपल्या पराक्रमाने विजापूरच्या अदिलशाहाच्या दरबारात मानाचे स्थान मिळविळलेल्या या विराच्या भूमीत मटक्या सारख्या अवैद्य धंद्याने प्रतिमा डागळण्याचे काम केले आहे. गेल्या वर्षभरात मटका बुकीचे डफळापूर प्रमुख केंद्र बनले आहे.येथील अवैद्य धंद्याची जिल्हापोलीस प्रमखांनी स्वच्छता करावी अशी मागणी केली आहे.

संरपचाच्या इशाऱ्यांची पोलीसांनी घेतली गंभीर दखल
थेट प्रमुख चौकात सुरु असलेल्या मटक्यासह जुगार अड्ड्यावर मोठा हप्ता मिळत असल्याने जत पोलीसांचे हात या अवैध धंदेचालकांपर्यत पोहचत नव्हते.अखेर संरपच बालिकाकाकी चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याचा दिलेला इशाऱ्यांची पोलीसांनी गंभीर दखल घेतली,व दहा तासात मटका अड्ड्यावर छापे टाकले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.