डफळापूर : येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या गावचा तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे.त्यामुळे डफळापूरकरांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा विहिरीत पाणी नसल्याने गेल्या आठ दिवसापासून पाणी सुटलेले नाही.त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू असून विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे.दोन महिन्यापुर्वी डफळापूर तलावात सोडलेले पाणी पुर्णत: संपलेले आहे.
सध्या डफळापूरला तातडीने टँकर सुरू करावा किंवा म्हैसाळ योजनेतून डफळापूर, मिरवाड तलाव भरून द्यावा अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने तालुका प्रशासनाला केली आहे.
पाणीपट्टी भरूनही पाणी सोडले जात नाही.
डफळापूर सह परिसरातील गावांना म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी देवनाळ व बिंळूर कालव्यातून सोडले जाते.यासाठीची पाणीपट्टी भरूनही गेल्या पंधरा दिवसापासून पाणी सोडलेले नाही.आतापर्यत आमचा संयम बघितलाय,आता आक्रमकपणा बघा..
– मन्सूर खतीब,माजी सभापती
पाणी न सोडल्यास रस्त्यावर उतरणार..
डफळापूरात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.गेल्या आठ दिवसापासून पाणी सुटलेले नाही.ऐन दुष्काळात जगणे असह्य झाला आहे. त्यात पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागत आहे. हे दुरभाग्य दरवर्षी कायम आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करून प्रश्न मार्गी लावा.आता रस्त्यावर उतरून अंदोलन करावे लागेल
– बाबासाहेब माळी,सदस्य ग्रा.प.डफळापूर