विजयानंतर गोपीचंद पडळकर सर्वागीण विकास साधतील : कामाणा बंडगर

0
2

माडग्याळ,वार्ताहर : वंचित आघाडीचे उमेदवार आणि आमचे नेते  गोपीचंद पडळकर यांना जत तालुक्याच्या पूर्वभागात मतदारांनी चांगली साथ दिली असून त्यांचा सांगली लोकसभा मतदार संघातून विजय निश्चित असल्याचा विश्वास माडग्याळचे युवा नेते कामाणा बंडगर यांनी व्यक्त केला.

बंडगर म्हणाले, गोपीचंद पडळकर विजयानंतर जिल्ह्यातील विकासाची पोकळी करून काढतील.पडळकर यांच्या उमेदवार मुळे प्रस्थापितांना मोठा दणका बसला असून त्यांच्या उमेदवारीने जिल्हाचे राजकीय चित्र बदलेले आहे.पडळकरामध्ये कर्तृत्व,नेतृत्व आणि प्रभावी गुणांचा संगम असल्याने त्या जोरावर त्यांनी जत तालुक्यातील जनतेला सहज आपलेसे करून घेतल्यामुळे  निवडणुकीत मतदारांनी त्याप्रेमापोटी भरभरून प्रतिसाद दिला आहे.जत तालुक्यात पडळकरांचा विक्रमी मताधिक्य विजय निश्चित करणार असल्याने विरोधकांची झोप उडाली आहे.

ते पुढे म्हणाले की,इतर तालुक्यातील मानाने जत तालुक्याची विकासाची पोकळी मोठी आहे.अनेक समस्या आ कसून उभ्या आहेत. सिंचन योजना व रस्ताचा अनुशेष मोठा आहे. खासदारांच्या माध्यमातून गोपीचंद पडळकरंच 

जत तालुक्याच्या सर्वागीण विकास करतील असा विश्वास व्यक्त करून वंचित आघाडीला दिलेले मतदान वाया जाणार नाही असेही शेवटी बंडगर म्हणाले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here