जत,प्रतिनिधी : रेवनाळ ता.जत येथील एका शेतकऱ्यांने कर्जास कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.सोपान आप्पा वाघमोडे वय- 65 असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
घटनास्थंळ व पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी,सोपान वाघमोडे यांची रेवनाळ हद्दीत 4 एकर शेती आहे.शेतीसाठी त्यांनी काही बँक व खाजगी सावकारांकडून कर्जे काढली होती.शेतीतून त्यांना अपेक्षित उत्पन्न येत नव्हते.त्यामुळे कर्ज फिटत नसल्याने ते आर्थिक विंवचनेत होते.कर्जाच्या मानसिक दबावातून त्यांनी शुक्रवारी सकाळी राहत्या घरी विषारी औषध पिले.काहीवेळानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने जत येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.मात्र तत्पुर्वी विष शरिरात मिसळल्याने त्यांचा मुत्यू झाला.शेतकरी सोपान यांनी कोणत्या बँका व खाजगी सावकारांकडून किती कर्जे काढली आहेत यांची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.मात्र त्यांचा मुलगा शामराव यांनी दिलेल्या फिर्याद व जबाबात कर्जास कंटाळून त्यांच्या वडीलांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.दरम्यान शासनाकडून दुष्काळी उपाययोजना मदत देण्यात होत असलेली दिंरगाई शेतकऱ्यांच्या जीवावर उठत आहे.