जत,प्रतिनिधी : आघाडी सरकारच्या काळात जत तालुक्यावर नेहमीच अन्याय केलेला आहे. जत तालुक्याच्या वाट्याला आलेले म्हैसाळ योजनेचे पाणी व विकास कामाचा निधी आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पळवून नेऊन जत तालुक्याचा विकास खुंटवला होता. खुंटलेल्या विकासाला चालना देण्याचं काम खासदार संजय पाटील यांनी केले आहे.त्याकरिता जातीपातीच्या राजकारणाला थारा देऊ नका विकासाच्या राजकारणाला साथ द्या असे आवाहन आमदार विलासराव जगताप यांनी केले.ते येळवी,बागलवाडी,मोकाशेवाडी, सिंगनहळ्ळी,वायफळ,निगडी खुर्द,खैराव, टोणेवाडी,सनमडी,काराजनगी,घोलेश्
आमदार जगताप म्हणाले,मी कधीही जातीपातीचे राजकारण केले.नसून फक्त विकासाचे राजकारण केलेले आहे. म्हैशाळ योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करून 2093 कोटीचा निधी योजनेसाठी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे साठ गावाना पाणी मिळाले आहे.आम्ही विकास कामाच्या जोरावर मते मागत आहेत. आघाडी सरकारच्या काळातील चाळीस वर्षाच्या कामाचे मूल्यमापन व भाजपचे पाच कामाचे मतदारांनी मूल्यमापन करावे.विरोधकानी स्वतःचं कर्तृत्व सांगून मते मागावी, फक्त निवडणुकीला तोंड दाखवणाऱ्या नेत्यांना जनताच जागा दाखवील असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.
जत :येळवी ता. जत येथे खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ बोलताना आमदार विलासराव जगताप व उपस्थित मान्यवर